आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राम सेतू वादावर अक्षय कुमारचे उत्तर:म्हणाला - चित्रपट ड्रामा फिक्शन असून ख-या आयुष्यातील घटनेपासून प्रेरित आहे

किरण जैन | मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'राम सेतू' या आगामी चित्रपटामुळे माजी राज्यसभा खासदार डॉ. सुब्रमण्यम स्वामी आणि अक्षय कुमार चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी स्वामी यांनी त्यांचे वकील सत्य सभरवाल यांच्यामार्फत अक्षय कुमारसह चित्रपटाशी संबंधित 8 जणांना बौद्धिक संपदा अधिकारांची माहिती देण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवली होती. अक्षयच्या या चित्रपटात राम सेतूबाबत चुकीचे तथ्य दाखवले जात असल्याचा आरोप स्वामींनी केला आहे. आता या कायदेशीर नोटीसला उत्तर देताना अक्षयच्या टीमने उत्तर दिले आहे. मात्र, अक्षयच्या उत्तरावर स्वामींचे वकील सत्य सभरवाल समाधानी नाहीत.

अक्षयकडे योग्य उत्तर नाही - सत्य
दिव्य मराठीशी संवाद साधताना सत्य सांगतात, "आम्हाला 7 सप्टेंबर रोजी कायदेशीर नोटीसचे उत्तर मिळाले. या उत्तराने आम्ही अजिबात समाधानी नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्यांचे उत्तर अतिशय अस्पष्ट आहे. राम सेतू वाचवण्यासाठी न्यायालयाची कार्यवाही एक महत्त्वाचा भाग, ज्याच्याशी माझे क्लायंट सुब्रमण्यम स्वामी 2007 पासून संबंधित आहेत. जर चित्रपट निर्माते हा भाग दाखवत असतील, तर त्यांनी हा निर्णय कशाच्या आधारावर घेतला. आमच्या नोटीसमध्ये आम्ही त्यांना चित्रपटात दाखवलेल्या न्यायालयीन प्रक्रियेबद्दल विचारले होते. ज्याचे त्यांच्याकडे योग्य उत्तर देखील नाही."

स्पष्ट उत्तराची वाट पाहतोय - सत्या
कायदेशीर नोटीसच्या उत्तरात मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सत्य म्हणाले, "अक्षयने सांगितले की हा चित्रपट निव्वळ ड्रामा फिक्शन आहे. जो वास्तविक जीवनातील घटनेवरून प्रेरित आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, हा चित्रपट निव्वळ काल्पनिक कथा आहे तर दुसरीकडे ते वास्तव घटनेपासून प्रेरणा घेत असल्याचे सांगत आहेत. ही दोन्ही विधाने अत्यंत विरोधाभासी आहेत. आम्ही स्पष्ट उत्तराची वाट पाहत आहोत. लवकरच आम्ही रीजोइनर दाखल करू आणि त्याला त्याचे स्पष्टीकरण देण्यास सांगू," असे सत्य यांचे म्हणणे आहे.

अक्षयचे यापूर्वीचे चित्रपटही कायदेशीर वादात सापडले आहेत
राम सेतूमध्ये अक्षय एका पुरातत्त्वशास्त्रज्ञाची भूमिका साकारत आहे, जो भारत आणि श्रीलंका यांच्यातील राम सेतूबद्दल सत्य शोधण्यासाठी काम करत आहे. या चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अभिषेक शर्माने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. अक्षयचा चित्रपट कायदेशीर वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीचे रुस्तम (2016), जॉली एलएलबी (2017), एअरलिफ्ट (2017) आणि सम्राट पृथ्वीराज (2022) सारखे चित्रपटही कायदेशीर वादात अडकले होते.

बातम्या आणखी आहेत...