आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'राम सेतू' ठरला अक्षयचा यावर्षीचा चौथा फ्लॉप चित्रपट:बजेट 150 कोटी आणि कमावले फक्त 60 कोटी, मानधनाचा आकडा 50 कोटी रुपये

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेता अक्षय कुमार लवकरच सिल्व्हर स्क्रीनवर ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. महेश मांजरेकरांच्या आगामी वेडात मराठे वीर दौडले सात या ऐतिहासिक चित्रपटात तो छत्रपती शिवरायांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाद्वारे तो मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. आता चाहत्यांचे लक्ष अक्षयच्या या चित्रपटाकडे लागले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर विक्रम करणार, अशी आशा वर्तवली जात आहे. दुसरीकडे मात्र अक्षयच्या खात्यात मागील काही दिवसांपासून फ्लॉप चित्रपट जमा होत आहेत. नुकताच प्रदर्शित झालेला राम सेतू हे त्याचे ताजे उदाहरण आहे. 'राम सेतू' या चित्रपटाकडून अक्षयला खूप अपेक्षा होत्या. यावर्षीच्या दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला हा चित्रपट प्रेक्षकांना थिएटरकडे वळवण्यात यशस्वी होईल, असा अंदाज समीक्षकांनी वर्तवला होता. मात्र हा अंदाज खरा ठरला नाही.

150 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या चित्रपटाने कमावले फक्त 60 कोटी
'राम सेतू' हा चित्रपट 150 कोटींच्या बजेटमध्ये बनला होता. पण हा चित्रपट त्याच्या निर्मिती खर्चाचा निम्मा खर्चही बॉक्स ऑफिसवर वसूल करु शकला नाही. या चित्रपटाने रिलीजच्या आठ दिवसांत अवघे 60 कोटींचे कलेक्शन केले आहे. खरं तर चित्रपटाला चांगली ओपनिंग मिळाली होती. पहिल्या दिवशी या चित्रपटाने 15 कोटींची कमाई केली होती. मात्र नंतर कमाईत घसरण होत गेली. रिलीजच्या आठव्या दिवशी राम सेतूने 2.90 कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे बॉक्स ऑफिसचे एकूण कलेक्शन आता 61.90 कोटी रुपये झाले आहे.

अक्षयचा यावर्षीचा चौथा फ्लॉप चित्रपट
यापूर्वी अक्षय कुमारचे ‘बच्चन पांडे’, ‘सम्राट पृथ्वीराज’, ‘रक्षाबंधन’ हे तिन्ही चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. मात्र आता 'राम सेतू' ची अवस्था पाहून हा चित्रपट अक्षयचा चौथा फ्लॉप चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे 'बच्चन पांडे', 'सम्राट पृथ्वीराज' आणि 'रक्षाबंधन' या चित्रपटांच्या ओपनिंग डे कलेक्शनपेक्षा 'राम सेतू'चे पहिल्या दिवसाचे कलेक्शन समाधानकारक होते.

'राम सेतू'साठी अक्षयने घेतले 50 कोटी
'राम सेतू' या चित्रपटासाठी अक्षय कुमारे तब्बल 50 कोटी रुपये मानधन घेतले. तर त्याच्या सहअभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांनी अनुक्रमे 4 कोटी आणि 3 कोटी रुपये मानधन घेतले आहे.

'राम सेतू' हा चित्रपट अभिषेक शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. अक्षयसह चित्रपटात जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटात अक्षयने पुरातत्त्वशास्त्रज्ञाची भूमिका वठवली आहे.

बातम्या आणखी आहेत...