आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामायणातील 'रावण' काळाच्या पडद्याआड:अरविंद त्रिवेदींना अरुण गोविल यांची श्रद्धांजली, म्हणाले - मला ते प्रभू म्हणून हाक मारायचे, ते आज प्रभू राम यांच्याकडे निघून गेले

उमेश कुमार उपाध्याय14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे

रामानंद सागर यांच्या गाजलेल्या रामायण या पौराणिक मालिकेत प्रभू श्रीरामांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी अरविंद त्रिवेदी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या निधनाने अरुण गोविल यांना मोठा धक्का बसला आहे. अरविंद त्रिवेदी यांच्या आठवणींना उजाळा देत पाणावलेल्या डोळ्यांनी ते म्हणाले, "स्क्रीन ही एक वेगळी बाब आहे, पण वैयक्तिक जीवनात माझे अरविंद त्रिवेदी यांच्याशी खूप चांगले संबंध होते. आम्ही खूप चांगले मित्र होतो. आम्हाला एकमेकांबद्दल खूप आदर होता. जेव्हाही ते मला बघायचा, तेव्हा हात जोडून मला प्रभू म्हणून हाक मारायचे. त्यांनी मला कधीच माझ्या नावाने हाक मारली नाही, त्यांनी कायम प्रभू म्हणूनच मला हाक मारली आणि मी त्यांना नेहमी अरविंद भाई म्हणत असे.'

निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे
अरुण गोविल पुढे म्हणाले, त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मी स्तब्ध स्तब्ध झालो, कारण त्यांच्याशी 10-12 दिवसांपूर्वीच माझे बोलणे झाले होते. मात्र, त्यांची प्रकृती ठीक नव्हती. ज्याला तुम्ही आपले मानता, ती व्यक्ती निघून गेल्यानंतर एक कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण होत असते. आज मी माझा एक अत्यंत जवळचा मित्र कायमचा गमावला आहे. तो एक उत्कृष्ट कलाकार होते, पण त्यासोबतच ते खूप चांगले माणूस होते. एक अतिशय चांगली व्यक्ती आज आपल्यातून निघून गेली आहे.

मला खात्री आहे की ते रामजींकडे गेले असतील
गोविल पुढे म्हणाले, त्यांच्या अंत्यविधीला मला जाता आले नाही. आज जरा उशिरा उठलो. सकाळी उठलो, मग मेसेज पाहिला. त्यांच्या घरी फोन केला, तोपर्यंत त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले होते. सकाळी 7 वाजताच त्यांना स्मशानभूमीत नेण्यात आले. त्यानंतर तिथे जाण्यात काहीच अर्थ नव्हता. मी जाऊ शकलो नाही, पण त्यांच्या कुटुंबाला भेटायला जाईल. मला खात्री आहे की ते प्रभू श्रीरामांकडे गेले असतील. मालिकेत त्यांनी रावणाची भूमिका साकारली, पण जीवनातील त्यांचा दृष्टिकोन खूप सकारात्मक होता. ते भगवान शिव यांचे महान भक्त होते.

देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो
'मालिकेत आम्ही दोघांनीही विरुद्ध पात्र साकारले होते, पण आमच्यात कधीही वैयक्तिक-व्यावसायिक स्पर्धा नव्हती. आमच्यात जेवढेही सीन असायचे, त्यावेळी आम्ही एकत्र बसायचो, खाणे -पिणे एकत्र असायचे. आम्ही सेटवर मित्रांप्रमाणे राहायचो. त्यांच्याबरोबरच्या अनेक आठवणी आहेत. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो,' अशा शब्दांत अरुण गोविल यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...