आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारामानंद सागर यांच्या 'रामायण'मध्ये भगवान रामाची भूमिका साकारून लोकप्रिय झालेले अभिनेते अरुण गोविल यांनी नुकतीच एक आलिशान कार खरेदी केली आहे. स्वतः अरुण गोविल यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून त्यांच्या चाहत्यांना ही माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये अरुण गोविल आणि त्यांच्या पत्नी श्रीलेखा गोविल त्यांच्या नवीन मर्सिडीज बेंझ कारवरुन पडदा उचलताना दिसत आहेत.
देवाच्या कृपेने कुटुंबात नवीन वाहनाचा आगमन झाले आहे
व्हिडिओ शेअर करताना अरुण गोविल यांनी लिहिले, ‘देवाच्या कृपेने कुटुंबात नवीन वाहनाचे आगमन झाले आहे. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छांची अपेक्षा आहे.’ अरुण गोविल यांच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी कमेंट करत त्यांचे अभिनंदन केले आहे. तर काहींनी धमाल प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतकेच नाही तर काही नेटक-यांनी मात्र ही कार जर्मनी मेड असल्याच्या मुद्द्यावरून अरुण गोविल यांची खिल्ली देखील उडवली आहे.
हे प्रभू, पुष्पक विमानाच्या जागी 'मेड इन जर्मनी' कार घेऊन आलात
एका नेटक-याने लिहिले, "नवीन वाहन खरेदी केल्याबद्दल अरुण गोविल जी यांचे खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. देव तुम्हाला नवीन वाहनाचा आनंद देत राहो, आणि तुमचे नवीन वाहन उत्तम प्रकारे चालत राहो," अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
तर एका यूजरने म्हटले, "हे प्रभू, पुष्पक विमानाच्या जागी तुम्ही कोणते 'मेड इन जर्मनी' वाहन घेऊन आलात?' आणखी एका युजरने लिहिलं, "प्रभु तुम्हाला काय गरज होती या गाडीची तुमच्यासाठी तर स्वर्गातून पुष्पक विमान आले असते."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.