आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातानंतर रंभाने दिले मुलीच्या तब्येतीचे अपडेट:म्हणाली- माझी मुलगी सायशा ठीक आहे, आम्ही घरी परतलोय

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री रंभा हिचा नुकताच अपघात झाला होता. या अपघातात तिच्या मुलीला दुखापत झाली होती आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले होते. आता सोशल मीडियाच्या माध्यमातून रंभाने मुलीच्या तब्येतीविषयीची माहिती दिली आहे. तिने मुलीसाठी प्रार्थना केल्याबद्दल चाहत्यांचे आभारही मानले आहेत.

मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते
एक व्हिडिओ शेअर करत रंभा म्हणाली, 'आम्ही लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केल्याबद्दल मी माझे सर्व चाहते, मित्र आणि कुटुंबीयांचे आभार मानते. मी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. तुम्ही दिलेल्या प्रेमाने आणि पाठिंब्याने माझे मन भरून आले आहे,' अशा शब्दांत रंभाने आपल्या भावना व्यक्त केल्या.

माझी मुलगी सायशा ठीक आहे
रंभा पुढे म्हणाली, 'कृपया आमच्यासाठी प्रार्थना करत राहा. तुम्ही मला दिलेल्या पाठिंब्याबद्दल तुमचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. माझी मुलं सुरक्षित आहेत. माझी मुलगी सायशा ठीक आहे. आम्ही सर्व घरी परतलो आहोत. तुम्हा सर्वांचे आभार. मला हे जाणून खूप आनंद झाला की, मी अजूनही तुमच्या लक्षात आहे.'

रंभाची मुलगी सायशा हिला रुग्णालयात दाखल करण्यात आले
रंभाच्या गाडीला अपघात झाला त्यावेळी गाडीत तिच्यासह तिची लहान मुलं आणि आया होत्या. रंभाने इंस्टाग्रामवर मुलीचा एक फोटो शेअर केला होता. यात सायशावर इस्पितळात उपचार सुरू असताना दिसले. दुसऱ्या आणि तिसऱ्या फोटोत अपघातानंतर गाडीची अवस्था दाखवण्यात आली. रंभाने कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'मुलांना शाळेतून आणत असताना आमच्या गाडीला दुसऱ्या गाडीने धडक दिली. यावेळी गाडीत माझ्यासोबत मुले आणि मदतनीस होत्या. आम्ही सर्व सुरक्षित आहोत. किरकोळ जखमा झाल्या आहेत. माझी छोटी सायशा अजूनही हॉस्पिटलमध्ये आहे. कृपया आमच्यासाठी प्रार्थना करा. तुमच्या प्रार्थनेची सर्वाधिक गरज आहे,' असे रंभा म्हणाली होती.

'जुडवा' या चित्रपटाद्वारे मिळाली होती रंभाला ओळख
'जुडवा', 'घरवाली बाहरवाली', 'क्यूंकी में झुठ नहीं बोलता' या गाजलेल्या हिंदी चित्रपटांमध्ये झळकलेल्या रंभाने तेलुगू, तामिळ, कन्नड, मल्याळम, बंगाली, भोजपूरी आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये काम केले आहे. रंभाचे खरे नाव विजयलक्ष्मी आहे. तिने दोन दशकांत 100 हून अधिक चित्रपटांत काम केले. रंभा सलमानसोबत जुडवा या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली होती.

आता चित्रपटांपासून दूर असलेल्या रंभाने 8 एप्रिल 2010 मध्ये इंद्र कुमार पद्मनाथनसोबत विवाह केला. इंद्र मॅजिकवुड्स नावाच्या कंपनीचे सीईओ आहेत. कॅनडातील ही कंपनी किचन कॅबिनेट आणि बाथरुम व्हॅनिटीज बनवते. रंभा तिचे पती आणि तीन मुलांसह आता कॅनडात स्थायिक झाली आहे. 13 जानेवारी 2011 रोजी रंभाने पहिली मुलगी लान्या आणि 31 मार्च 2015 रोजी लहान मुलगी सायशाला जन्म दिला. 2018 मध्ये तिच्या मुलाचा जन्म झाला.

बातम्या आणखी आहेत...