आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्ण मंदिरात पोहोचली RRR ची स्टारकास्ट:रामचरण, ज्युनियर एनटीआर आणि राजामौली यांना पाहण्यासाठी अमृतसर विमानतळावर शिरले चाहते, सुरक्षारक्षकांनी काढले बाहेर

मजिठा/(अमृतसर)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट 25 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

मल्टीस्टारर आणि बहुभाषिक चित्रपट RRR चे दिग्दर्शक एस.एस. राजामौली आणि चित्रपटातील कलाकार ज्युनियर एनटीआर आणि रामचरण सोमवारी अमृतसर श्रीदरबार साहिब येथे पोहोचले. टीमने सुवर्ण मंदिरात नतमस्तक होऊन चित्रपटाच्या यशासाठी प्रार्थना केली. या कलाकारांची एक झलक बघण्यासाठी विमानतळावर त्यांच्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. चाहते जबरदस्तीने प्रतिबंधित क्षेत्रात घुसले, त्यांना अधिकारी आणि सुरक्षारक्षकांनी पकडले आणि बाहेर काढले.

'बाहुबली' फेम दिग्दर्शक राजामौली यांचा RRR हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात महागड्या चित्रपटांच्या यादीत अव्वलस्थानी आहे. कोविड महामारीमुळे त्याची रिलीज डेट वारंवार पुढे ढकलली गेली. अखेर आता हा चित्रपट 25 मार्चला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

गुरुद्वाराच्या परिसरात चित्रपट कलाकारांसोबत सेल्फी घेताना लोक.
गुरुद्वाराच्या परिसरात चित्रपट कलाकारांसोबत सेल्फी घेताना लोक.

राजामौली दुसऱ्यांदा तर दोन्ही स्टार्स पहिल्यांदाच आले
एसएस राजामौली यापूर्वी एकदा गोल्डन टेंपलमध्ये आले आहेत. मीडियाशी संवाद साधताना दोन्ही कलाकारांनी सांगितले की, ते पहिल्यांदाच अमृतसरला आले आहेत. ज्युनियर एनटीआर आणि रामचरण म्हणाले की, इथे आल्यावर एक प्रकारची शांतता मिळते जी कुठेच मिळत नाही. दक्षिणेतील लोकांइतकेच पंजाबचे लोकही त्यांच्यावर प्रेम करतात, असे ते म्हणाले.

चाहत्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती.
चाहत्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती.

पंजाबमध्ये साऊथ चित्रपटांचा मोठा चाहता
पंजाबमध्ये साऊथ चित्रपटांचे चाहते सातत्याने वाढत आहेत. OTT प्लॅटफॉर्म आणि राजामौली सारख्या काही दिग्दर्शकांच्या मल्टी लँग्वेज चित्रपटांमुळे ही क्रेझ आणखी वाढली आहे. त्यामुळेच या चित्रपटांच्या रिलीजची धूम पंजाबसह देशभरात बघायला मिळत आहे. हे चित्रपट राज्यात चांगला व्यवसाय करत आहेत.

विमानतळावर जबरदस्तीने घुसलेल्या चाहत्यांना बाहेर काढताना सुरक्षा रक्षक.
विमानतळावर जबरदस्तीने घुसलेल्या चाहत्यांना बाहेर काढताना सुरक्षा रक्षक.

चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ
दक्षिणेतील बडे स्टार्स ज्युनियर एनटीआर आणि रामचरण तेजा यांच्यासाठी श्रीदरबार साहिब कॉम्प्लेक्स आणि विमानतळावर चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ होती. चाहत्यांनी या कलाकारांसोबत सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी केली होती. विमानतळावर या कलाकारांना बघण्यासाठी काही लोक जबरदस्तीने आत शिरले होते. विमानतळ प्राधिकरण आणि सुरक्षा पथकाने त्यांना पकडले आणि बाहेर काढले. त्याचवेळी काही लोकांशी त्यांची बाचाबाची देखील झाली होती.

बातम्या आणखी आहेत...