आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार महेश बाबूचे मोठे भाऊ रमेश बाबू यांचे निधन झाले आहे. रमेश बाबू अॅक्टर तसेच प्रोड्यूसर होते. शनिवारी उशिरा रात्री त्याचे रुग्णालयात निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांना लिव्हरचा त्रास जाणवत होता. वयाच्या अवघ्या 56 व्या वर्षी रमेश बाबू यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. रमेश बाबूंच्या निधनापुर्वीपासून महेश बाबू कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून, ते क्वारंटाईन आहेत. रमेश बाबूंच्या निधनाची बातमी समोर येताच त्याचे चाहते आणि साऊथ इंडस्ट्री सोशल मीडियावर रमेश बाबूंना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
चित्रपट निर्माते बीए राजू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रमेश बाबू यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यानी ट्विट करत म्हटले आहे की, "अत्यंत दु:खाने सांगावे लागत आहे की, आमचे लाडके रमेश बाबू यांचे निधन झाले आहे. ते सदैव आपल्या हृदयात जिवंत राहतील. मी सर्व हितचिंतकांना विनंती करतो की कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे आणि स्मशान स्थळी जमणे टाळावे" असे आवाहन बीए राजू यांनी केले आहे.
तीन दिवसांपूर्वी महेश बाबू कोरोना पॉझिटिव्ह
महेश बाबूंना तीन दिवसांपुर्वीच म्हणजे 6 जानेवारीला कोरोनाची लागण झाली आहे. त्याची माहिती स्वत: महेश बाबूंनी सोशल मीडियावर दिली होती. त्यांनी पोस्ट करत असे म्हटले होते की,"कोरोनाचे अनेक नियम पाळून देखील अखेर माझा कोरोनाचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे. मला कोरोनाची हल्की लक्षणे आहेत. त्यामुळे मी क्वारंटाईन होत आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, अशी मी सर्वांना विनंती करतो. तसेच ज्यांनी कोरोनाची लस घेतली नसेल त्यांनी कोरोना लस घेऊन टाकावी" अशी पोस्ट करत महेश बाबूंनी त्यांच्या चाहत्यांना आवाहन केले होते. महेश बाबूची पत्नी नम्रता शिरोडकर आणि तिची बहिण शिल्पा शिरोडकर या दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
'अल्लूरी सीतारामाराजू' या चित्रपटातून केले होते पदार्पण
महेश बाबू प्रमाणेच रमेश बाबूंचा दक्षिणात्य चित्रपटात एक अग्रेसर स्थान आहे. रमेश बाबू यांनी 1974 साली 'अल्लूरी सीतारामाराजू' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. त्यानंतर रमेश बाबूंनी अनेक चित्रपटात आपली भुमिका साकारली आहे. 'ना इले ना स्वर्गम', 'अन्ना चेलेलु', 'चिन्नी कृष्णुडु', 'पच्चा थोरानम', 'मुग्गुरु कोडुकुलु', 'सम्राट', 'कृष्ण गरी अब्बायी', 'बाजार राउडी', 'कलियुग कर्णुडु', 'ब्लैक टाइगर' ', 'आयुधम', 'कलियुग अभिमन्युडु' अशा लोकप्रसिद्ध चित्रपटात रमेश बाबूंनी काम केले आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.