आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लगीनघाई!:राणा दग्गुबाती आणि मिहिकाला लागली हळद, उद्या दोघे होणार विवाहबद्ध; कोरोना महामारीमुळे फक्त खास 30 पाहुण्यांना दिले निमंत्रण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लग्नसोहळा हैदराबादमधल्या रामानायडू स्टुडिओत पार पडणार आहे.

दाक्षिणात्य अभिनेता राणा दग्गुबाती आणि मिहिका लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. राणा ठरलेल्या तारखेलाच लग्न करणार आहे. त्यांच्या लग्नाचा विधी बायो-सिक्योर बबलमध्ये होणार आहे दोघांनी लॉकडाऊनच्या काळात साखरपुडा केला होता आता ते 8 ऑगस्ट रोजी लग्न करणार आहेत. सूत्रानुसार, लग्न मोठ्या थाटामाटात होणार आहे. लग्नात फक्त खास लोकांनाच आमंत्रण देण्यात आले आहे. नुकताच दोघांचा हळदी समारंभ पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो समोर आले आहेत.

राणाचे वडील पाहुण्यांचा जीव धोक्यात घालू इच्छित नाहीत

लग्नाचा सगळा कार्यक्रम हैदराबादच्या रामानायडू स्टुडिओमध्ये होणार आहे. पाहुण्यांमध्ये फक्त कुटुंब आणि मित्रच सहभागी होणार आहेत. राणा दग्गुबातीचे वडील सुरेश बाबू यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, 30पेक्षा जास्त लोक सहभागी होणार नाहीत. आम्ही अनेक मित्र आणि इंडस्ट्रीतील जवळच्या लोकांनादेखील कोरोनाच्या धास्तीने आमंत्रण दिले नाही. आम्ही पाहुण्यांचा जीव धोक्यात घालणार नाही.