आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राणाची आपबीती:70% हॅमरेज आणि 30% होती मृत्यूची शक्यता; खराब प्रकृतीबद्दल सांगताना राणा डग्गुबती झाला भावुक

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बोलता बोलता भावूक झाला राणा

'बाहुबली' या गाजलेल्या चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणारा अभिनेता राणा डग्गुबती अलीकडेच समांथा अक्किनेनीचा चॅट शो सॅम जॅममध्ये सहभागी झाला होता. या शोमध्ये राणाने आपल्या प्रकृतीबाबत एक मोठा खुलासा केला. एक काळ असा होता, जेव्हा माझ्या जीवाला धोका होता, असे राणाने या शोमध्ये सांगितले. राणाचा अनुभव ऐकून समांथासह सर्वजण भावूक झाले.

बोलता बोलता भावूक झाला राणा
समांथाच्या या चॅट शोमध्ये राणाने पहिल्यांदा आपल्या तब्येतीबद्दल खुलासा केला. राणा म्हणाला की, 'जेव्हा तुमचे आयुष्य वेगाने पुढे जात असते तेव्हाच अचानक एक पॉज लागतो.
मला बीपी होता, हृदयाभोवती कॅल्सीफिकेशन होते आणि मूत्रपिंडही कमी काम करायला लागले होते. अशा परिस्थितीत 70 टक्के शक्यता ही हॅमरेजची होती तर 30 टक्के शक्यता ही
माझा मृत्यू होण्याची होती.' हे सांगताना राणा भावूक झाला होता.

म्हणून झाला राणाच्या तब्येतीचा उल्लेख
गेल्या वर्षी जुलैमध्ये राणा डग्गुबतीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, यात तो फार कमकुवत आणि आजारी दिसला होता. असे म्हटले जाते की, राणाने मूत्रपिंड प्रत्यारोपण केले होते, पण राणाने स्वत: हे नाकारलेहोते. तेव्हा राणा म्हणाला होता की, माझी तब्येत ठीक आहे आणि माझ्या प्रकृतीविषयी येणा-या बातम्या आता कंटाळवाण्या झाल्या आहेत.

ऑगस्टमध्ये झाले लग्न
राणाचे याचवर्षी ऑगस्ट महिन्यात मिहिका बजाजसोबत लग्न झाले. हैदराबाद येथील रामानायडू स्टुडिओत झालेल्या या लग्नाला फक्त 30 पाहुणे सहभागी झाले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजके लोक लग्नात हजर होते.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser