आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आनंदाची बातमी:'बाहुबली'चा भल्लालदेव म्हणजेच राणा डग्गुबातीला मिळाली जोडीदार, इन्स्टाग्रामवर गुड न्यूज देताना म्हणाला - 'आणि ती हो म्हणाली आहे'

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोनम कपूरने राणा कुटुंबात केले मिहिकाचे स्वागत

'बाहुबली' चित्रपटात भल्लालदेवची भूमिका साकारणारा दाक्षिणात्य सुपरस्टार राणा डग्गुबातीने लॉकडाऊनच्या काळात आपल्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.  लाँग टाइम गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबतचा एक क्यूट फोटो सोशल मीडियावर शेअर करुन तिने लग्नाला हो म्हटले असल्याचे सांगितले आहे.

राणाने मंगळवारी त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन गर्लफ्रेंड मिहिका बजाजसोबतचा एक फोटो शेअर करत लिहिले, 'आणि ती म्हणाली आहे.' दोघेही दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. पण त्यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले नव्हते. 

View this post on Instagram

And she said Yes :) ❤️#MiheekaBajaj

A post shared by Rana Daggubati (@ranadaggubati) on May 12, 2020 at 4:17am PDT

विशेष म्हणजे या दोघांनीही आतापर्यंत त्यांचे सोबतचे एकही छायाचित्र शेअर केले नव्हते. अशातच ही आनंदाची बातमी मिळताच त्याचे चाहते उत्साहित आहेत. या दोघांनी अद्याप त्यांच्या लग्नाचा प्लान सांगितलेला नाही.  

कोण आहे मिहिका बजाज?

राणाची गर्लफ्रेंड मिहिका हैदराबादची असून इंटेरियर डिझायनर आहे. सोबतच ती इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीही चालवते. तिने मुंबई आणि लंडनमधून शिक्षण घेतले आहे. अभिनेत्री सोनम कपूर ही मिहिकाची जवळची मैत्रीण आहे. मिहिकाने सोनमच्या लग्नालाही हजेरी लावली होती. शिवाय ती सोनमसोबतचे छायाचित्रही शेअर करत असते.

  • सोनमने राणा कुटुंबात केले मिहिकाचे स्वागत

राणाची पोस्ट समोर येताच सेलिब्रिटी त्यांना शुभेच्छा देत आहेत. मिहिका आणि राणाने त्यांचे नाते सार्वजनिक केल्यानंतर सोनमने इंस्टा स्टोरीवर त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. दोघांचे एक सुंदर छायाचित्र शेअर करताना सोनमने लिहिले, 'अभिनंदन. राणा तुला आनंदी ठेवणार. राणा कुटुंबात तुझे स्वागत आहे.' 

बातम्या आणखी आहेत...