आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्न बंधनात अडकला 'भल्लालदेव':हैदराबादमध्ये पार पडला राणा दग्गुबती आणि मिहिका बजाजचा विवाह सोहळा, लग्नात आलेल्या पाहुण्यांची करण्यात आली कोरोना टेस्ट, पाहा फोटो

हैदराबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या वर्षाच्या मे महिन्यात राणा दग्गुबाती, मिहिका बजाज यांची रोका सेरेमनी झाली होती
  • मिहिका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी ड्यूड ड्रॉप डिझाईन स्टुडिओची संस्थापक आहे.

'बाहुबली' फेम भल्लालदेव म्हणजेच राणा दग्गुबातीने मिहिका बजाजशी लग्न केले आहे. शनिवारी हैदराबादमधील रामानायडू स्टुडिओमध्ये त्यांच्या लग्नाचे विधी पूर्ण झाले. या समारंभात जोडप्याचे कुटुंबातील सदस्य, निवडक नातेवाईक, मित्र आणि चित्रपटसृष्टीतील काही लोक सहभागी झाले होते. समांथा अक्किनेनी नागा चैतन्य, राम चरण आणि अलू अर्जुन यांनी लग्नात येऊन राणा आणि मिहिका यांना शुभेच्छा दिल्या.

राम चरनने इंस्टाग्रामवर राणाचे अभिनंदन केले आणि लिहिले की, "फायनली मेरे हल्कने (राणाला तो प्रेमाने म्हणतो) लग्न केले. राणा दग्गुबाती आणि मिहिका बजाज यांचे वैवाहिक जीवन सदैव सुखी राहावे"

कोविड -19 च्या प्रोटोकॉलकडे लक्ष दिले

लग्नाच्या वेळी कोविड -19 चे प्रोटोकॉल लक्षात ठेवून सॅनिटायझर स्टँड आणि डिस-इन्फेक्टेंट टनल्स कार्यक्रमस्थळावर ठेवण्यात आले होते. सामाजिक अंतराचे देखील पालन करण्यात आले. असे सांगितले जात आहे की लग्नात 30 पेक्षा कमी लोक उपस्थित होते आणि कोविड -19 चाचणी प्रत्येकाच्या येण्यापूर्वी घेण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...