आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रात्री आलियासोबत शूटिंगवरून परतला रणबीर:दमलेले दिसले दोघे, चाहत्यांसह क्लिक केले फोटो

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. याआधी दोन्ही कलाकार या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहेत. आता नुकताच रणबीर आणि आलियाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये रात्री उशिरा शूटिंग संपल्यानंतर दोघेही एकत्र घरी परतताना दिसले. व्हिडिओमध्ये दोघांचेही चेहरे थकलेले दिसत आहेत. असे असूनही रणबीर त्याच्या चाहत्यांसोबत फोटो क्लिक करताना दिसला. चाहते या व्हिडिओवर भरभरून प्रेम करत आहेत. आलिया गरोदर असून तिने प्रेग्नेंसीतही काम सुरु ठेवले आहे.

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्र या चित्रपटाचा ट्रेलर आणि गाणी सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारित आहे. प्रेम, रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्स सारंच या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासह बिग बी अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय यांच्या देखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...