आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर सध्या त्यांचा अपकमिंग चित्रपट 'तू झूठी मैं मक्कार'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहेत. काही दिवसांपूर्वीच श्रद्धा कपूरने अहमदाबादच्या एक मॉलमध्ये चित्रपटाचे प्रमोशन केले होते. तेथे तरुणाईच्या गराड्यात प्रचंड उत्साहा पाहायला मिळाला. खरेतर, मोठ्या पडद्यावर या चित्रपटाच्या माध्यमातून हे दोन्ही कलाकार पहिल्यांदाच एकत्र येत आहेत. यामुळे चाहत्यांनाही आपल्या या आवडत्या कलाकारांना एकत्र पाहण्याची उत्सुकता आहे. आता 'तू झूठी मैं मक्कार'च्या सर्टिफिकेट आणि ड्यूरेशनवरून एक अपडेट समोर आली आहे.
किती मोठा असेल चित्रपट?
लव रंजन यांनी दिग्दर्शित केलेला 'तू झूठी मैं मक्कार' चित्रपट 8 मार्च 2023 रोजी रिलीज होत आहे. चित्रपटाच्या रिलीजला फक्त काही दिवसांचाच वेळ उरला आहे. यामुळे प्रमोशनमध्ये कलाकार आणि चित्रपटाची टीम कोणतीही कसर ठेवू इच्छित नाही.
यादरम्यान चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करून सांगितले आहे की, चित्रपटाला सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनकडून UA सर्टिफिकेट मिळाले आहे. त्यांनी ट्विट केले की, '#एक्सक्लूसिव्ह...'TJMM' रन टाइम...#TuJhoothiMainMakkar ला 2 मार्च 2023 रोजी सीबीएफसीकडून UA सर्टिफिकेट मिळाले आहे. चित्रपटाचे ड्यूरेशन 159.59 मिनिटे:सेकंद (दोन तास, 39 मिनिटे, 59 सेकंद) आहे. #India' त्यांनी असेही सांगितले की, चित्रपटाचा फर्स्ट हाफ 01 तास, 09 मिनिटे, 39 सेकंदांचा आहे. तर, सेकंड हाफ 01 तास, 30 मिनिटे, 20 सेकंदांचा आहे.
या जागांवर झाली चित्रपटाची शूटिंग
चित्रपटाच्या बहुतांश भागाची शूटिंग मुंबईत झाली आहे. या मूव्हीसाठी 'तेरे प्यार में' हे गाणे स्पेनमध्येही चित्रित झाले. लव रंजन यांच्या चित्रपटात तुम्हाला मॉरीशसचीही सुंदर दृश्ये पाहायला मिळतील.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.