आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारणबीर कपूर आणि आलिया भट्ट बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, दोघे याच महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये लग्नबंधनात अडकणार आहेत. लग्नाआधी रणबीर बॅचलर पार्टीचीही योजना आखत असल्याचे वृत्त आहे. दरम्यान, रणबीरच्या बॅचलर पार्टीत सहभागी होणाऱ्या पाहुण्यांची यादीही समोर आली आहे. दोघेही त्यांचे वैयक्तिक आयुष्य लाइमलाइटपासून दूर ठेवतात. त्यामुळे या कपलने त्यांचे लग्न अतिशय जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत करण्याचा निर्णय घेतला आहे.
बालपणीचे आणि जवळचे मित्र होतील सामील
पिंकविलाच्या वृत्तानुसार, रणबीर त्याच्या घरीच बॅचलर पार्टी आयोजित करण्याचा विचार करत आहे. त्याच्या पार्टीला त्याचे इंडस्ट्रीतील जवळचे मित्र आणि बालपणीचे मित्र उपस्थित राहणार आहेत. या यादीत अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर आणि अयान मुखर्जी यांच्या नावांचा समावेश आहे. हे तिघेही रणबीरच्या खूप जवळ आहेत.
RK हाऊसमध्ये होणार आहे लग्नसोहळा
रिपोर्ट्सनुसार, आलिया आणि रणबीर यांनी डेस्टिनेशन वेडिंग न करता मुंबईतच लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. रणबीरने स्वतः लग्नाचे ठिकाण निश्चित केले आहे. त्याचे वडिलोपार्जित घर म्हणजे चेंबुरस्थित आरके हाऊस येथे हा लग्नसोहळा पार पडणार आहे. याच ठिकाणी 20 जानेवारी 1980 रोजी रणबीरचे आईवडील नीतू आणि ऋषी कपूर विवाहबंधनात अडकले होते. त्यामुळे रणबीरलाही आलियासोबत चेंबूर येथील घरी लग्न करायचे आहे. या लग्नात 450 पाहुणे सहभागी होणार असून त्यासाठी 'शादी स्क्वाड वेडिंग प्लॅनर'ची नेमणुक करण्यात आली आहे. रणबीर आणि आलियाची 17 एप्रिल ही लग्नाची तारीख निश्चित झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.