आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्रह्मास्त्र'ने पहिल्या दिवशी केली 75 कोटींची कमाई:कोरोना कालावधीनंतर पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हिंदी चित्रपट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी रिलीज झालेल्या 'ब्रह्मास्त्र'ने पहिल्याच दिवशी कमाईचे अनेक विक्रम मोडले आहेत. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात 35 कोटींची कमाई केली आहे. तर चित्रपटाचा ग्लोबल बिझनेस 75 कोटी आहे. कोरोना कालावधीनंतर सर्वात मोठी ओपनिंग मिळवणारा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट आहे. हा चित्रपट रणबीर कपूरचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ओपनिंग डे कलेक्शन ठरला आहे. याआधी संजूने 35 कोटींची कमाई केली होती.

अयान मुखर्जीने पहिल्या दिवसाची कमाई शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.
अयान मुखर्जीने पहिल्या दिवसाची कमाई शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

रणबीरचा हाईएस्ट ओपनिंग असलेला चित्रपट
अयान मुखर्जी दिग्दर्शित 410 कोटींच्या ब्रह्मास्त्रने हिंदी पट्ट्यात जवळपास 30 कोटींची कमाई केली आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात या चित्रपटाने 5.80 कोटींची कमाई केली आहे. तर या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 75 कोटी आहे. 'ब्रह्मास्त्र' हा रणबीरचा गेल्या 6 चित्रपटांपैकी पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. त्याचबरोबर ट्रेड पंडितांच्या मते हा चित्रपट पहिल्या वीकेंडमध्ये 100 कोटींचा आकडा गाठेल. या चित्रपटात रणबीर-आलियाशिवाय नागार्जुन, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

ब्रह्मास्त्रला जगभरात मिळाल्या आठ हजार स्क्रीन्स

ब्रह्मास्त्र हा चित्रपट 9 सप्टेंबर रोजी भारतात 5,019 स्क्रीन्सवर आणि परदेशात सुमारे 3,894 स्क्रीन्सवर रिलीज झाला. चित्रपटाचे वितरण हक्क स्टार स्टुडिओकडे आहेत. 21 फॉक्स स्टार स्टुडिओच्या शीर्षकातून फॉक्स काढून टाकण्यात आले आहे. अशा परिस्थितीत या स्टुडिओच्या नव्या नावाने प्रदर्शित होणारा ब्रह्मास्त्र हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाचे जगभरात वॉल्ट डिस्ने स्टुडिओ मोशन पिक्चर फिल्म्सने वितरण केले आहे. हा चित्रपट भारतात 5,019 स्क्रीनसह जागतिक स्तरावर 8,913 स्क्रीन्समध्ये रिलीज झाला आहे.

अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये 'ब्रह्मास्त्र'ने 'RRR'ला मागे टाकले
वृत्तानुसार, बुधवारी रात्रीपर्यंत 'ब्रह्मास्त्र'च्या पहिल्या दिवसाची 11 कोटी रुपयांची तिकिटे विकली गेली होती. त्यापैकी एकट्या हिंदी पट्ट्यात या चित्रपटाने 10 कोटींहून अधिक अॅडव्हान्स कमाई केली आहे. अयानच्या या चित्रपटाने हिंदी व्हर्जनच्या अ‍ॅडव्हान्स बुकिंगमध्ये आरआरआरला मागे टाकले आहे. RRR ची पहिल्या दिवशी 7 कोटींची अ‍ॅडव्हान्स बुकिंग झाली होती. मात्र, या बाबतीत 'ब्रह्मास्त्र' 'KGF 2'ला मागे टाकू शकलेला नाही.

ओपनिंग वीकेंडला 23 कोटींहून अधिक तिकिटांची विक्री झाली
इंडस्ट्री ट्रॅकिंग पोर्टलनुसार, ब्रह्मास्त्रच्या हिंदी व्हर्जनची ओपनिंग वीकेंड बुकिंग 22.25 कोटी इतकी आहे. चित्रपटाच्या तेलुगू व्हर्जनने 98 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि तामिळमध्ये 11.1 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची तिकिटे विकली आहेत. त्याच वेळी, कन्नड आणि मल्याळम व्हर्जनमधी चित्रपटाची आगाऊ बुकिंग मात्र कमी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...