आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'ब्रह्मास्त्र' ठरला पहिल्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट:देशात 125 कोटी आणि जगभरात 225 कोटींची कमाई, रणबीरने आमिर-सलमानला पछाडले

25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारर ब्रह्मास्त्र पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर कमाईच्या बाबतीत विक्रम करत आहे. या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी 45 कोटींची कमाई केली आहे. ब्रह्मास्त्रने पहिल्या वीकेंडमध्ये भारतात 125 कोटींची कमाई केली आहे. त्यानुसार ब्रह्मास्त्र हा गेल्या 6 वर्षात पहिल्या वीकेंडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. यासोबतच चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर 225 कोटींची कमाई केली आहे.

चित्रपटाचा तीन दिवसांचा ग्लोबल बिझनेस

अयान मुखर्जीच्या ब्रह्मास्त्रची भारताबरोबरच परदेशातही चांगली कमाई होत आहे. या चित्रपटाने जागतिक बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी 75 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवसाच्या कमाईत 10 कोटींची भर घालत चित्रपटाने 85 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या व्यवसायात घसरण बघायला मिळाली. तिस-या दिवशी चित्रपटाने 65 कोटींची कमाई केली आहे.

410 कोटींच्या निर्मिती खर्चात बनला ब्रह्मास्त्र

अयान मुखर्जी दिग्दर्शित ब्रह्मास्त्रचे एकुण बजेट 410 कोटी आहे. भारतात या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन 36 कोटी होते. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने 6 कोटी अधिक म्हणजे एकुण 42 कोटी कमावले. त्याच वेळी, तिसर्‍या दिवशी कमाईत 45 कोटी म्हणजेच 3 कोटींची वाढ झाली आहे. अशा स्थितीत ब्रह्मास्त्र हा रणबीरचा गेल्या 6 चित्रपटांपैकी पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

ट्रेड पंडितांच्या मते येत्या 2 दिवसांत हा चित्रपट 300 कोटींचा टप्पा गाठेल. या चित्रपटात रणबीर-आलियाशिवाय नागार्जुन, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

पीव्हीआर आणि आयनॉक्सचे शेअर्स वधारले
ब्रह्मास्त्र रिलीज झाल्यानंतर पीव्हीआर आणि आयनॉक्सचे स्टॉक्स 8% घसरल्याचे अनेक अहवाल शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यामुळे पीव्हीआर आणि आयनॉक्सला 800 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे कारण ब्रह्मास्त्राला सांगितले जात होते.

पण PVR आणि Inox चे शेअर्स सोमवारी 4% (रु. 75) आणि 4.75% (रु. 22) वाढले आहेत. बाजारातील पॉझिटिव्ह सेंटिमेंट्समुले दोन्ही शेअर्समध्ये ही तेजी आली आहे. त्यामुळे पीव्हीआर आणि आयनॉक्सचे बाजार भांडवल 450 कोटी रुपयांनी वाढले आहे. भारतातील मनोरंजन क्षेत्र भविष्यात चांगली कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

अयानने मानले प्रेक्षकांचे आभार

रविवारी ब्रह्मास्त्रचे दिग्दर्शक अयान मुखर्जीने दोन दिवसांचे कलेक्शन शेअर करत आनंद व्यक्त केला. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'या जगात प्रेमापेक्षा मोठे ब्रह्मास्त्र नाही.' सोबतच अयानने प्रेक्षकांचे आभार मानत या वीकेंडला थिएटरला भेट देऊन तुमचे प्रेम दाखवल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार, असे म्हटले आहे.

वीकेंडला अॅडव्हान्स बुकिंगमधून 23 कोटींची कमाई केली
इंडस्ट्री ट्रॅकिंग पोर्टलनुसार, ब्रह्मास्त्रच्या हिंदी व्हर्जनचे ओपनिंग वीकेंड बुकिंग 22.25 कोटी इतके होते. चित्रपटाच्या तेलुगू आवृत्तीची 98 लाख रुपयांपेक्षा जास्त आणि तमिळमध्ये 11.1 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीची तिकिटे विकली गेली. कन्नड आणि मल्याळम व्हर्जनची चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग खूपच कमी होती.

बातम्या आणखी आहेत...