आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणबीर-आलियाचा साखरपुडा:रणबीरच्या निकटवर्तीयांचा दावा - साखरपुडा होण्याची शक्यता, आलियाचे काका मुकेश म्हणाले - मुलाकडच्यांनी काहीही बोलण्यास मनाई केली आहे

अमित कर्ण4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • करण जोहरच्या देखरेखीखाली तयारी सुरु, महेश भट्ट पोहण्याची शक्यता

बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध सेलिब्रिटी सध्या जयपूर आणि रणथंभौर येथे दाखल झाले आहेत. कपूर आणि भट्ट कुटुंबीय सध्या रणथंभोरमध्ये आहेत. ते येथील अमन-ए-खास रिसॉर्टमध्ये मुक्कामाला आहेत. येथे आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या साखरपुड्याची शक्यता आहे. दोन्ही कुटुंबाकडून महत्त्वाचे निर्णय घेणारे सदस्य तिथे पोहोचले आहेत.

काका म्हणाले - मुलाकडच्यांनी काहीही बोलण्यास मनाई केली आहे
आलिया भट्टचे काका मुकेश भट्ट यांनी दैनिक भास्करला सांगितले - ''याक्षणी मी या विषयावर काहीही बोलू शकत नाही. मी हो किंवा नाही असे म्हणणार नाही. मी खोटे बोलू शकत नाही. माझी ती
अडचण आहे. मला खोटे बोलण्यास भाग पाडू नका आणि खरं मी सांगू शकत नाही. ही निर्बंध सध्या मुलाकडच्यांकडून येत आहे. याक्षणी मी काहीही सांगू शकत नाही. जेव्हा सर्व काही निश्चित होईल,
तेव्हा मी नक्की सांगेन. सध्या मी मुंबईत नाही. पण कुठे आहे, ते विचारु नका.''

करण जोहर आणि त्याची टीम मॅनेजमेंट पाहतील
दुसरीकडे रणबीरच्या कुटूंबाचा जवळचा मित्र म्हणाला की, साखरपुड्याची चर्चा सुरु आहे. करण जोहरच्या देखरेखीखाली सर्व तयारी केली जात आहे. दोन्ही कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येथे पोहोचले
नाहीत. अनेकजण दिल्ली, रणथंभोरमार्गे पोहोचले आहेत. करण जोहर येथे पोहोचणार असून त्याच्यासोबत तीन ते चार जणांची टीम तीन दिवसांपूर्वीपासून जयपूर आणि रणथंभोर येथे आहे. हे सर्व या तयारीत व्यस्त आहेत.

फॅमिली आणि फ्रेंड्स येण्याची शक्यता
रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण राजस्थानात आल्यामुळे ही शक्यता बळकावली आहे. रणवीह सिंग आलियाच्या अगदी जवळ आहे. आलियानेच तिच्या आयुष्यातील या खास प्रसंगी दीपिका आणि
रणवीरला आमंत्रित केले आहे. नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमासुद्धा परिवारासह येथे आली आहे.

रणथंभोर ठरु शकले वेडिंग डेस्टिनेशन
अशी चर्चा आहे की आलिया आणि रणबीर रणथंभोर येथे लग्नदेखील करु शकतात. रणथंभोर येथील ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये हे स्टार थांबले आहेत, ते जगातील प्रसिद्ध वेडिंग डेस्टिनेशन आहे. याच
हॉटेलमध्ये पॉप गायिका केटी पॅरी आणि रसेल ब्रांड यांचे लग्न झाले आहे. तेव्हापासून हे हॉटेल मोठ्या सेलिब्रिटींच्या महागड्या लग्नासाठी एक सुरक्षित ठिकाण मानले जाते. या हॉटेलला वर्ल्ड बेस्ट
व्हॅलेंटाईन हॉटेलचा पुरस्कारही मिळाला आहे.

बातम्या आणखी आहेत...