आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्या लग्नाची चर्चा सध्या जोरात सुरु आहे. वृत्तानुसार, 13 किंवा 14 एप्रिलपासून या कपलचा विवाहसोहळा सुरू होणार आहे. चेंबूरच्या 'आरके हाऊस'मध्ये लग्नाआधीच्या विधी आणि भव्य विवाहसोहळा पार पडणार आहे. 3-4 दिवसांच्या सेरेमनीनंतर 17 एप्रिलला रणबीर-आलिया पंजाबी रितीरिवाजानुसार लग्न करणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
13 एप्रिल रोजी आलियाच्या हातावर लागणार मेहंदी
ई-टाइम्सच्या वृत्तानुसार, आरके हाऊसमध्ये दोघांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. या जोडप्याचा विवाहपूर्व सोहळाही पंजाबी रितीरिवाजानुसार पार पडणार आहे. मात्र, या दोघांच्या लग्नाच्या तारखेबाबत दोघांच्या कुटुंबीयांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. कुटुंबीयांना दोघांच्या लग्नाचा गाजावाजा करायचा नाहीये. 13 एप्रिल रोजी या आलियाच्या हातावर मेहंदी लावली जाणार आहे. यानंतर हळद, संगीतासह सर्व सोहळे होतील.
या भव्य लग्नासाठी कपूर घराण्याचा वारसा असलेल्या आरके बंगल्याची निवड करण्यात आली आहे. सूत्र सांगदतात, "कुटुंबाचा अर्थ द वर्ल्ड फॉर द कपल आहे. हे कदाचित या पिढीतील कपूर घराण्यातील शेवटचे लग्न असेल." या भव्य बंगल्यात एक प्रशस्त लॉन आहे आणि येथेच हा विवाहसोहळा होईल. रणबीरचे आई-वडील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा विवाह 20 जानेवारी 1980 रोजी आरके हाऊसमध्येच झाला होता.
लग्नाला उपस्थित राहणा-या सेलिब्रिटींची यादी
रणबीर आणि आलियाच्या या ग्रॅण्ड वेडिंगला चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, करण जोहर, झोया अख्तर, अभिनेता वरुण धवन, त्याचा भाऊ रोहित धवन, डिझायनर मसाबा गुप्ता, दीपिका पदुकोण आणि रणबीर-आलियाच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या नावाचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आलियाने बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खानलाही तिच्या लग्नात आमंत्रित केले आहे. याशिवाय अर्जुन कपूर, फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा आणि अनुष्का रंजन हेदेखील या लग्नाला उपस्थित राहणार आहेत.
रणबीर कपूरने त्याच्या लग्नात टेक्निशियन, हेअर आणि मेकअप आर्टिस्ट, स्पॉट बॉय आणि त्याच्यासोबत वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सर्व असिस्टंटनाही आमंत्रित केले आहे. या लग्नात 450 हून अधिक पाहुणे सहभागी होणार असून, त्यासाठी 'शादी स्क्वाड वेडिंग प्लानर्स' नेमण्यात आले आहेत.
हनिमूनसाठी स्वित्झर्लंडला जाणार कपल
दरम्यान, रणबीरच्या बॅचलर्स पार्टीत सहभागी होणाऱ्या पाहुण्यांची यादीही समोर आली आहे. रणबीर त्याच्या घरीच बॅचलर पार्टी आयोजित करण्याचा विचार करत आहे. त्याच्या पार्टीला त्याचे इंडस्ट्रीतील जवळचे मित्र आणि बालपणीचे मित्र उपस्थित राहणार आहेत. या यादीत अर्जुन कपूर, आदित्य रॉय कपूर आणि अयान मुखर्जी यांच्या नावांचा समावेश आहे. हे तिघेही रणबीरच्या खूप जवळ आहेत. रिपोर्टनुसार, लग्नानंतर आलिया आणि रणबीर हनीमूनसाठी स्वित्झर्लंडला जाणार आहेत.
4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत रणबीर आणि आलिया
रणबीर आणि आलिया 4 वर्षांहून अधिक काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. दोघेही एकमेकांच्या कुटुंबांशी चांगले बाँडिंग शेअर करतात. रणबीरची आई नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी आलियाला खूप आवडतात आणि अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टवर ती त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसते. दुसरीकडे रणबीरदेखील अनेकदा आलियाची बहीण शाहीन भट्ट आणि आई सोनी राजदान यांच्यासोबत चिल करताना दिसतो.
'ब्रह्मास्त्र'मध्ये पहिल्यांदाच एकत्र दिसणार ही जोडी
आलिया आणि रणबीर लवकरच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय आलियाकडे करण जोहरचा 'तख्त', 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' हे चित्रपट आहेत. दुसरीकडे रणबीर लव रंजनच्या आगामी अनटायटल चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे. या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.