आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामावर परतले!:रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी सुरु केले 'ब्रह्मास्त्र'चे चित्रीकरण, व्हिडिओच्या माध्यमातून दोघेही सांगणार ‘ब्रह्मास्त्र’चा अर्थ

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विज्ञानावर आधारित आहे हा आगामी चित्रपट

कोरोना अनलॉक झाल्यानंतर बॉलिवूड सक्रिय झाले आहे. अनेक चित्रपटाची निर्मिती सुरू झाली आहे. यातच आगामी चित्रपट ‘ब्रह्मास्त्र’चे कलाकार रणबीर कपूर अाणि आलिया भट्ट यांनी चित्रपटाची डबिंगचे काम सुरू केले आहे. काम लवकर व्हावे म्हणून ते गेल्या दोन आठवड्यापासून यावर काम करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहेत.

या चित्रपटाच्या टीजर आधी कलाकारांचा एक व्हिडिओ रिलीज होणार आहे. यात दोघे कलाकार ‘ब्रह्मास्त्र’विषयी माहिती देणार आहेत. आलिया आणि रणबीर यात ईशा आणि शिवाचे पात्र साकारत आहेत. या स्पेशल व्हिडिओ सिरीजचे शूटिंग 10 ते 12 दिवस चालेल. चित्रपटासाठी एक डान्स सिक्वेंसदेखील शूट व्हायचे आहे. जे मुुंबईत होईल.

  • अमिताभ बच्चन देखील शूटिंग सुरु करणार

या चित्रपटात रणबीर आणि आलिया यांच्यासह बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचाही महत्त्वाची भूमिका आहे. बिग बी चित्रपटाच्या शेवटच्या शेड्युलमध्ये चित्रीकरणात सहभागी होणार आहेत. आणि ते रणबीर सोबतच्या महत्त्वाच्या दृश्यांचे शूटिंग करतील.

हा चित्रपट यापूर्वी 4 डिसेंबर 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. मात्र कोरोनाची पार्श्वभूमी बघता रिलीज डेट लांबणीवर टाकण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चित्रपटाची रिलीज डेट अद्याप निश्चित करण्यात आलेली नाही. कारण भारतात सध्या तरी चित्रपटगृह सुरु होतील अशी परिस्थिती दिसत नाहीये.

बातम्या आणखी आहेत...