आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर-आलिया वेडिंग:एप्रिल महिन्यात लग्नबंधनात अडकणार आहेत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट, चेंबूरस्थित RK हाऊसमध्ये होणार लग्नसोहळा

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • RK हाऊसमध्ये होणार लग्न

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट बऱ्याच दिवसांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. रिपोर्ट्सनुसार हे दोघे आता या महिन्यातच लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत. दोघेही त्यांचे वैयक्तिक आयुष्य लाइमलाइटपासून दूर ठेवतात. एप्रिल महिन्यात होणा-या या लग्नात दोघांच्या कुटुंबीयांसह जवळचे मित्र सहभागी होणार आहेत.

RK हाऊसमध्ये होणार लग्न
रिपोर्ट्सनुसार, आलिया आणि रणबीरचे लग्न मुंबईतच जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. रणबीरने स्वतः लग्नाचे ठिकाण निश्चित केले असून त्याला त्याचे वडिलोपार्जित घर आरके हाऊस येथे लग्नबंधनात अडकायचे आहे. याच ठिकाणी त्याचे आई-वडील ऋषी कपूर आणि नीतू कपूर यांचा विवाह 20 जानेवारी 1980 रोजी झाला होता. त्यामुळे रणबीरलाही चेंबूरस्थित त्यांच्या निवासस्थानी लग्न करायचे आहे. या लग्नात 450 पाहुणे सहभागी होणार असून त्यासाठी 'शादी स्क्वाड वेडिंग प्लॅनर'ची नेमणुक करण्यात आली आहे. मात्र, लग्नाची तारीख अद्याप समोर आलेली नाही.

लग्नाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही
लग्नाला उपस्थित राहणाऱ्या जवळच्या लोकांना एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून मोकळे राहण्याची सूचना देण्यात आली आहे. लग्नाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. कपूर कुटुंबाला एप्रिल महिन्याच्या शेवटी लग्न करायचे होते, पण आलिया भट्टचे आजोबा नरेंद्र नाथ राजदान यांच्या प्रकृतीमुळे भट्ट कुटुंबाला हे लग्न लवकरात लवकर करायचे आहे.

'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र दिसणार आलिया-रणबीर
आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच अयान मुखर्जीच्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत. याशिवाय आलियाकडे करण जोहरचा 'तख्त', 'रॉकी और रानी की प्रेमकहानी' आणि 'डार्लिंग्स' हे चित्रपट आहेत. तर रणवीर लव रंजन यांच्या आगामी चित्रपटात श्रद्धा कपूरसोबत दिसणार आहे. या चित्रपटात डिंपल कपाडिया आणि बोनी कपूर देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...