आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर-आलियाचे लग्न:रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार नाहीत, 2022 मध्ये अडकतील लग्नाच्या बेडीत

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत रणबीर आणि आलिया

अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यावर्षी डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याची चर्चा होती. पण आता बातम्या येत आहेत की, हे दोघे 2021 मध्ये नव्हे तर 2022 मध्ये लग्न करणार आहेत.

रणबीर-आलियाच्या जवळच्या एका सूत्राने सांगितले की, दोघांनाही लग्न करायचे आहे, परंतु यावर्षी तसे होणार नाही. सूत्राने पुढे सांगितले की, "आलिया आणि रणबीर यांनी लग्नासाठी उत्तम योजना आखली आहे आणि त्यामुळे त्यांना घाई करायची नाही. ते त्यांच्या लग्नाची खूप दिवसांपासून योजना आखत आहेत."

मात्र, हे लग्न कधी होणार याबद्दल सूत्राने दुजोरा दिलेला नाही. पण, रणबीर आणि आलिया यावर्षी नव्हे तर पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये लग्न करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याआधी रणबीरचे काका रणधीर कपूर यांनीही स्पष्ट केले आहे की, आतापर्यंत त्यांना त्यांच्या पुतण्याच्या लग्नाची कोणतीही बातमी मिळालेली नाही.

आलिया भट्टने अलीकडेच सोशल मीडियावर स्वतःचा एक फोटो शेअर केला होता. या फोटोवरून रणबीर आणि आलियाचा साखरपुडा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. आलियाने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिच्या हातात रणबीरचा लकी नंबर 8 ची अंगठी दिसत आहे. आलियाच्या आणखी एका मिरर सेल्फीमध्ये तिच्या हातात ही अंगठी दिसत आहे. हे दोन फोटो समोर आल्यानंतर त्यांच्या साखरपुड्याची चर्चा सुरु झाली.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणबीर या वर्षाच्या अखेरीस संदीप रेड्डी वंगा यांच्या 'अ‍ॅनिमल'चे शूटिंग सुरू करणार होता. पण, आता त्याने हे शूट पुढील वर्षीपर्यंत पुढे ढकलले आहे. तो आता 2022 मध्य'अ‍ॅनिमल'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. यादरम्यान तो फक्त मार्च 2022 मध्ये रिलीज होणाऱ्या 'शमशेरा'चे प्रमोशन करणार आहे. दुसरीकडे, आलिया नोव्हेंबरच्या अखेरीस तिच्या सर्व वर्क कमिटमेंट पूर्ण करेल. तिने 'डार्लिंग' चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे.

4 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत रणबीर आणि आलिया
रणबीर आणि आलिया 4 वर्षांहून अधिक काळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. असे म्हटले जाते की, दोघे गेल्या वर्षी लग्न करणार होते, पण कोरोनामुळे त्यांनी त्यांचे लग्न पुढे ढकलले. रणबीरने एका मुलाखतीत म्हटले होते की, जर कोरोना व्हायरस नसता तर कदाचित त्याने आलियाशी आधीच लग्न केले असते.

रणबीर आणि आलिया एकमेकांच्या कुटुंबांशी चांगले बाँडिंग शेअर करतात. रणबीरची आई नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर साहनी आलियाला खूप आवडतात आणि अनेकदा तिच्या सोशल मीडिया पोस्टवर ती त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसते. दुसरीकडे रणबीरदेखील अनेकदा आलियाची बहीण शाहीन भट्ट आणि आई सोनी राजदान यांच्यासोबत चिल करताना दिसतो.

रणबीर-आलिया जोडी 'ब्रह्मास्त्र'मध्ये पहिल्यांदा एकत्र दिसणार
लवकरच रणबीर-आलिया ही जोडी अयान मुखर्जीच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटात प्रथमच रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. रणबीर-आलिया व्यतिरिक्त या चित्रपटात अमिताभ बच्चन, मौनी रॉय, नागार्जुन अक्किनेनी आणि डिंपल कपाडिया मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात शाहरुख खानचीही छोटी भूमिका आहे.

बातम्या आणखी आहेत...