आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेडिंग बेल्स:रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांचा साडी डिझायनरसोबतचा फोटो व्हायरल, चाहते म्हणाले – लग्नाची खरेदी

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एप्रिलमध्ये होणार लग्न

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार दोघे एप्रिल महिन्यात लग्न करणार आहेत. दरम्यान, रणबीर आणि आलियाचा साडी ब्रँडच्या सीईओ आणि डिझायनरसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून चाहत्यांनी आलिया आणि रणबीर यांनी त्यांच्या लग्नाच्या शॉपिंगला सुरुवात केल्याचे म्हटले आहे.

डिझायनरसोबत आलिया आणि रणबीर

साडी ब्रँडच्या सीईओ आणि डिझायनर बीना कन्नन यांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये रणबीर आणि आलिया त्यांच्यासोबत दिसत आहेत. या दोघांना एका प्रसिद्ध ब्रँडच्या ओनरसोबत पोज देताना पाहून चाहत्यांनी त्यांच्या लग्नाबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.

एप्रिलमध्ये होणार लग्न
दोघांच्या या फोटोवर एका चाहत्याने लिहिले, "लग्नाची खरेदी." आणखी एका चाहत्याने लिहिले, "ही लग्नाची घंटा आहे का?" तर एक जण म्हणाला, "ही लग्नाची घंटा असल्याचे दिसत आहे..." सूत्रानुसार, रणबीर आणि आलियाने लग्नासाठी त्यांच्या शूटिंगमधून ब्रेक घेतला आहे.

दोघेही 'ब्रह्मास्त्र'मध्ये एकत्र दिसणार
वर्क फ्रंटबद्दल सांगायचे तर ही जोडी लवकरच 'ब्रह्मास्त्र'मध्ये दिसणार आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित हा चित्रपट 9 सप्टेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...