आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनाऊंसमेंट ऑफ द डे:रणबीर कपूर-अनिल कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल'ची रिलीज डेट ठरली, पुढील वर्षी दस-याच्या मुहूर्तावर होणार रिलीज

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हा चित्रपट पुढील वर्षी 2022 मध्ये दस-याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता रणबीर कपूर आणि अनिल कपूर स्टारर 'अ‍ॅनिमल' या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 2022 मध्ये दस-याच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याची माहिती अनिल कपूर यांनी स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. अनिल यांनी चित्रपटाचा टीझरही शेअर केला आहे. या चित्रपटात रणबीर कपूरची भूमिका थोडी वेगळी असणार आहे. रणबीरसह अनिल कपूर, परिणीती चोप्रा आणि बॉबी देओल यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

हा चित्रपट गुन्हेगारी विश्वावर आधारीत असून यात अनिल कपूर रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत आहे. तर परिणीती रणबीरच्या पत्नीच्या भूमिकेत असल्याचे समजते. बॉबी देओल रणबीरच्या भूमिकेच्या विरोधातली भूमिका साकारणार आहे.

'कबीर सिंह'चे दिग्दर्शक करणार दिग्दर्शन
‘कबीर सिंह’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वंगा यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनणार आहे. या चित्रपटाद्वारे रणबीर पहिल्यांदाच संदीपसोबत काम करणार आहे. तर या चित्रपटातून परिणीती आणि रणबीर देखील पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

रणबीरने 1 जानेवारीला शेअर केले होते मोशन पोस्टर
1 जानेवारी रोजी आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा करताना रणबीरने चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले होते. अनिल कपूर यांनीही या चित्रपटाची घोषणा करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये चित्रपटाशी संबंधित माहिती दिली गेली होती. या व्हिडिओमध्ये रणबीरचा आवाज ऐकू येतोय आणि तो म्हणतोय, 'पापा पुढच्या आयुष्यात तुम्हाला माझा मुलगा व्हायचं आहे, मग मी तुमच्यावर प्रेम कसे करतो हे पाहा. मग तुम्ही हे शिका कारण त्याच्या पुढच्या आयुष्यात मीच तुमचा मुलगा आणि तुम्हीच माझे वडील असाल.'

तर चित्रपटाचा टीजर व्हिडिओ शेअर करुन अनिल कपूर म्हणाले होते - ‘ओह बॉय! नवीन वर्ष या शिट्ट्यासारखा (व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये जो आवाज ऐकू येतोय) अधिक चांगले जावे. हा प्रवास सुरु करण्यासाठी मी अजून प्रतीक्षा करु शकत नाही.'

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सीरिज, प्रणय रेड्डी वांगाच्या भद्रकाली पिक्चर्स आणि मुराद खेतानींच्या सिने 1 स्टुडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...