आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शाहिद कपूर अभिनीत ‘कबीर सिंह’नंतर आता दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा रणबीर कपूरसोबत अॅनिमल चित्रपट घेऊन येत आहेत. काही आठवड्यापूर्वीच त्यांनी याचा टीजर रिलीज केला होता. विशेष म्हणजे या चित्रपटावर या वर्षी जूनपासून काम सुरू होणार आहे. कारण ते तोपर्यंत लव्ह रंजनचा चित्रपट पूर्ण करतील. संवाद लेखक सिद्धार्थ-गरिमा यांनी या बातमीला दुजोरा दिला आहे.
‘शक्ती’ आणि ‘शराबी’ सारखी नसणार कथा
चित्रपटाचे शीर्षक ‘अॅनिमल’ का ठेवले? असे सिद्धार्थ-गरिमाला विचारले यावर ते म्हणाले, “तुम्ही हा चित्रपट पाहिल्यावर रहस्य कळेल. मी एवढेच म्हणेण की, लोक जे अंदाज लावत आहेत तसे काहीही नाही. काही लोक अमिताभ बच्चन अभिनीत ‘शक्ती’ किंवा ‘शराबी’ सारखा असेल असेही म्हणत आहेत. पण तो तसाही नाही तो फक्त बाप लेकाच्या प्रेमावर आधारित आहे.
फेब्रुवारीच्या शेवटी सुरू होणार कथा वाचन
या चित्रपटात परिणीती चोप्रा आणि रणबीर कपूर पहिल्यांदाच सोबत काम करणार आहेत. अजून दोघांनी कथा वाचन सुरू केले नाही. लेखन पूर्ण होताच फेब्रुवारीनंतर सर्वच कथा वाचनात गुंतणार आहेत. रणबीर आणि परीच्या व्यतिरिक्त या चित्रपटात अनिल कपूर आणि बॉबी देओलदेखील मुख्य भूमिकेत आहेत.
बाप लेकाच्या प्रेमावर आधारित आहे कथा
चित्रपटाच्या टीजरमध्ये रणबीर कपूरचे संवाद पाहुन लोकांनी यात पुनर्जन्माचा प्लॉट असल्याचा अंदाज लावला होता, पण असे नाही. याविषयी सिद्धार्थ गरिमा सांगतात, संदीपसोबत आम्ही कबीर सिंहमध्येही काम केले होते. ‘अॅनिमल’देखील असाच लॉर्जर दॅन लाइफ चित्रपट आहे. संदीपने याला क्राइम ड्रामा जोनर नाव दिले आहे. यात कौटुंबिक पार्श्वभूमीदेखील आहे. यात एक मुलगा आपल्या वडिलांना पुनर्जन्म घेणार असल्याचे आणि वडिलांचा वडील होऊन मुलाला कसे प्रेम करतात, हे शिकवणार असल्याचे सांगतो. अशा प्रकारे संदीपने हा चित्रपट खूपच भावनिक केला आहे. मात्र यात मुलाच्या पात्राचे पुनर्जन्म होणार आहे. यात एक मुलगा आपल्या वडिलांना जीवापलीकडे प्रेम करतो, हे दाखवण्यात आले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.