आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूर त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबरच खासगी आयुष्यामुळे देखील खूप चर्चेत आहे. अलीकडेच रणबीर टी-सिरीजच्या ऑफिसमध्ये गेला होता. ज्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यावेळी त्याच्या मोबाइलवर असलेला वॉलपेपरवरचा फोटो दिसला. तो फोटो पाहून सर्वांनी अभिनेत्याचे भरभरून कौतुक केले आहे. यावेळी रणबीरच्या हातात असलेल्या मोबाइलवरच्या वॉलपेपरवरचा फोटो सर्वांना दिसला. रणबीरच्या फोन वॉलपेपरवर ना पत्नी आलियाचा फोटो आहे ना लाडकी लेक राहाचा फोटो. त्याच्या मोबाईलवर वडील ऋषी कपूर यांचा फोटो आहे. सोशल मीडियावर त्याचा हा फोटो व्हायरल होत आहे.
कसा झाला ऋषी कपूर यांचा मृत्यू?
ऋषी कपूर यांचे 20 एप्रिल 2020 रोजी वयाच्या 67 व्या वर्षी निधन झाले. ऋषी यांना कॅन्सर झाला होता. निधनाच्या दोन वर्षांपूर्वी त्यांना ल्युकेमिया कॅन्सरचे निदान झाले होते. उपचारांसाठी ते अमेरिकेतही गेले होते. त्यांनी उपचारांना चांगला प्रतिसाददेखील दिला होता. मात्र पुन्हा एकदा त्यांचा कॅन्सर बळावला आणि मुंबईतील एचएन रिलायन्स फाऊंडेशन रुग्णालयात त्यांचे निधन झाले.
या चित्रपटांमध्ये झळकणार आहे रणबीर
यावर्षी रणबीरचे बरेच चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. त्याच्या आगामी चित्रपटांबद्दल सांगायचे तर लवकर तो 'तू झुठी में मक्कार' या चित्रपटात दिसणार आहे. 8 मार्च 2023 रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून यात श्रद्धा कपूर त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय रणबीर 'अॅनिमल' या चित्रपटातही रश्मिका मंदाना हिच्याबरोबर दिसणार आहे. हा चित्रपट 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने तिच्या मुलीच्या नावाचा खुलासा केला आहे. आलिया-रणबीरने त्यांच्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. हे नाव नीतू कपूर यांनी निवडले आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी आपल्या मुलीच्या नावाचा अर्थही प्रत्येक भाषेत सांगितला आहे. वाचा सविस्तर...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.