आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाचे प्रमोशन सुरू केले आहे. रणबीरने अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान खुलासा केला की, त्याने चित्रपटाचे दिग्दर्शक अयान मुखर्जींपासून आपले आणि आलियाचे नाते काही काळ लपवले होते. रणबीर, आलिया आणि अयान हे चांगले मित्र आहेत आणि तिघांनीही 'ब्रह्मास्त्र'वर पाच वर्षे एकत्र काम केले आहे. रणबीर आणि आलिया चित्रपटाच्या सेटवर एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती.
अयानला सांगितले नाही
मीडियाशी बोलताना रणबीर म्हणाला, "आलिया, अयान आणि मी ब्रह्मास्त्र बनवण्यात खूप वेळ दिला आहे, त्यामुळे गेल्या काही वर्षांत आमचे आयुष्य खूप बदलले आहे. आम्ही जेव्हा कधी भेटायचो तेव्हा अयान फक्त चित्रपटाबद्गल बोलत असे. एक काळ असा होता जेव्हा आलिया आणि मी डेटिंग करू लागलो, तेव्हा आम्ही अयानला सांगूही शकत नव्हतो. कारण अयान रागावेल अशी भीती आम्हाला वाटत होती."
रिलेशनशिपबद्गल ऐकल्यानंतर अयानची प्रतिक्रिया
यावर प्रतिक्रिया देताना अयान म्हणाला, "जेव्हा रणबीरने मला त्याच्या नात्याबद्दल सांगितले तेव्हा माझी प्रतिक्रिया खूपच परिपक्व होती. मला हे ऐकून आनंद झाला. आणि मी एका चांगल्या मित्राप्रमाणेच यावेळी वागलो."
अयान आणि आलिया आधीपासूनच चांगले मित्र
आलियाने असाही खुलासा केला की, "मी रणबीरला डेट करण्यापूर्वी अयान आणि मी जवळचे मित्र होतो. यावर अयान म्हणाला, आलिया आणि मी पहिल्यांदा भेटलो तेव्हा खूप चांगले मित्र झालो. रणबीरला डेट करण्यापूर्वी आलिया आणि मी खूप जवळ होतो."
चित्रपटाचे नवीन गाणे 'देवा देवा' 8 ऑगस्टला प्रदर्शित
'ब्रह्मास्त्र'चे दुसरे गाणे 'देवा देवा' सोमवारी 8 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. कार्यक्रमात अयानने सांगितले की, संपूर्ण चित्रपटातील हे गाणे त्याचे आवडते गाणे आहे. या गाण्यात आलिया आणि रणबीरची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. या दोघांशिवाय अमिताभ बच्चन, मौनी रॉय आणि नागार्जुन अक्किनेनी देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट 9 सप्टेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.