आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फटा पोस्टर निकला हिरो':शमशेराच्या पोस्टर लाँचला रणबीरने दिला चाहत्यांना आश्चर्याचा धक्का, फॅनला कोसळले रडू

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओ पहा..

अलीकडेच रणबीर कपूर स्टारर 'शमशेरा' चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर लाँच करण्यात आले. पोस्टर लाँचवेळी रणबीर कपूरने त्याच्या चाहत्यांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला. YRF ने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये रणबीर पोस्टर फाडून आणि धमाकेदार एंट्री करत चाहत्यांना आश्चर्यचकित करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये रणबीर त्याच्या चाहत्यांना मिठी मारताना आणि त्यांच्यासोबत डान्स करताना दिसत आहे. रणबीरला अचानक भेटल्याने काही चाहत्यांना अश्रूदेखील अनावर झालेले दिसले. याशिवाय रणबीरने पोस्टर लाँचवेळी आपल्या एका छोट्या चाहतीला 'आय लव्ह यू'देखील म्हटले. चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर 'शमशेरा' या चित्रपटात रणबीर कपूर व्यतिरिक्त संजय दत्त आणि वाणी कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 22 जुलै 2022 रोजी रिलीज होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...