आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीरचे डिजिटल पदार्पण:लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे रणबीर कपूर, 'ऐसा वैसा प्यार' या लव्ह स्टोरीमध्ये झळकणार

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यामध्ये चार वेगवेगळ्या प्रेमकथा दाखवल्या जाणार आहेत, ज्या एकमेकांशी संबंधित असतील.

बॉलिवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक रणबीर कपूर लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. अभिनेत्याने इरोस नाऊसोबत हातमिळवणी केली आहे. 'ऐसा वैसा प्यार' या लव्ह स्टोरीतून तो डिजिटल पदार्पण करणार आहे. यामध्ये चार वेगवेगळ्या प्रेमकथा दाखवल्या जाणार आहेत, ज्या एकमेकांशी संबंधित असतील.

पिंकविलाच्या वृत्तानुसार, रणबीर नेहमीच त्याच्या पॉवर पॅक परफॉर्मन्सने प्रत्येक ग्रुपच्या प्रेक्षकांना प्रभावित करत आला आहे. त्याच्या ऑन-स्क्रिन चार्मला जगभरातील तरुणाईचे प्रेम मिळते. म्हणूनच निर्मात्यांनी रणबीरला त्यांच्या लव्ह स्टोरीत महत्त्वाची भूमिका दिली आहे.

या चित्रपटांमध्ये दिसणार आहे रणबीर

2018 मध्ये आलेल्या 'संजू' या चित्रपटात रणबीर अखेरचा मोठ्या पडद्यावर दिसला होता. आता तो लवकरच अयान मुखर्जीच्या आगामी ब्रह्मास्त्र या चित्रपटात आलिया भट्ट, अमिताभ बच्चन आणि मौनी रॉय यांच्यासोबत दिसणार आहे. याशिवाय तो शमशेरा चित्रपटातही काम करत आहे, यात त्याच्यासह वाणी कपूर दिसणार आहे. यासोबतच रणबीरकडे लव रंजनचा एक अद्याप शीर्षक न ठरलेला चित्रपटही आहे, ज्यामध्ये तो श्रद्धा कपूरसोबत स्क्रिन स्पेस शेअर करेल.

बातम्या आणखी आहेत...