आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीरचा नवा क्लॉज:चित्रपटांना होणा-या दिरंगाईवरुन रणबीरने घेतला नवीन धडा, आता जर चित्रपट वेळेवर पूर्ण झाला नाही तर दररोज प्रमाणे एक्स्ट्रा पैसे घेणार

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या चित्रपटांच्या दिरंगाईमुळे घेतला रणबीरने धडा

अभिनेता रणबीरने कपूरने आपल्या मागील काही चित्रपटांच्या चित्रीकरणाला झालेल्या दिरंगाईवरुन एक नवीन धडा घेतला आहे. आता त्याने आपल्या करारामध्ये एक नवीन क्लॉज जोडला आहे. रिपोर्टनुसार, आता जे चित्रपट ठरलेल्या वेळेत पूर्ण होणार नाही, अशा चित्रपटांसाठी तो दररोज प्रमाणे एक्स्ट्रा पैसे घेणार आहे. तो येत्या 6 जानेवारीपासून त्याच्या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असून त्याचे दिग्दर्शन लव रंजन करत आहेत.

मुंबई मिररच्या रिपोर्टनुसार, "चित्रपटांचे चित्रीकरण ठरलेल्या वेळेतच पूर्ण व्हायला हवे, यावर रणबीरचा आता भर असणार आहे. तो लव रंजन यांच्या आगामी चित्रपटाचे नॉनस्टॉप शूटिंग करुन मे 2021 पर्यंत ते पूर्ण करू इच्छित आहे."

या चित्रपटांच्या दिरंगाईमुळे घेतला रणबीरने धडा
अनुराग बासू दिग्दर्शित 'जग्गा जासूस' हा चित्रपट पूर्ण व्हायला तब्बल तीन वर्षे लागली. या चित्रपटाची शूटिंग 2014 मध्ये सुरू झाली होती आणि 2017 मध्ये चित्रपट प्रदर्शित झाला होता. याशिवाय अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ ची घोषणा 2017 मध्ये झाली होती आणि शूटिंग फेब्रुवारी 2018 मध्ये सुरू झाली. पण आता तीन वर्षे झाली असून या चित्रपटाचे शूटिंग अद्याप पूर्ण झाले नाही.

'ब्रह्मास्त्र' यावर्षी 4 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोना महामारीमुळे त्याचे शूटिंग पूर्ण होऊ शकले नाही आणि ते पुढे ढकलले गेले. रणबीरसह आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट आता 2021 मध्ये रिलीज होणार आहे.

2021 मध्ये रणबीर दोन चित्रपटांचे शूटिंग करणार
रिपोर्टनुसार, रणबीर 2021 मध्ये तीन चित्रपटांचे शुटिंग करणार आहे. 14 जानेवारीपर्यंत तो लव रंजन यांच्या चित्रपटाचे पहिले वेळापत्रक पूर्ण करेल. त्यानंतर, 'ब्रह्मास्त्र'चे उर्वरित शूटिंग 31 जानेवारीपूर्वी पूर्ण करण्याचा त्याचा प्रयत्न असेल. त्यानंतर तो मे 2021 पर्यंत लव रंजन यांच्या चित्रपटाचे नॉनस्टॉप शूटिंग करेल. याशिवाय तो 'कबीर सिंग' फेम दिग्दर्शक संजीव रेड्डी यांच्या दिग्दर्शनाखाली 'अ‍ॅनिमल' या गँगस्टर ड्रामाचे शूटिंग पूर्ण करेल.

बातम्या आणखी आहेत...