आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
रणबीर कपूरची आत्या रीमा जैन यांचा मुलगा अरमान जैन कायदेशीर प्रकरणात अडकला आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्याला टॉप्स ग्रुपशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात समन्स बजावले आहे. एजन्सीने जैन यांच्या घरी छापा टाकला, तेथे तो पत्नी अनिषा मल्होत्रा, आई रीमा जैन आणि इतर सदस्यांसह राहतो. या प्रकरणात आधीपासूनच चौकशी सुरू असलेले शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा विहंग याच्याशी संबंध असल्यामुळे त्याची या प्रकरणी चौकशी सुरू आहे.
छापेमारी दरम्यान आले होते मामांच्या निधनाचे वृत्त
तपासादरम्यान ईडीला अरमान जैन आणि विहंग सरनाईक यांच्यात झालेल्या संशयास्पद बोलण्याचे पुरावे मिळाले होते. यानंतर अरमानला समन पाठवण्यात आला आणि नंतर मंगळवारी त्याच्या घरी छापा टाकण्यात आला. याच दरम्यान अरमानचे मामा राजीव कपूर यांच्या निधनाचे वृत्त आले. ज्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी रीमा जैनला आपल्या भावाच्या घरी जाण्याची परवानगी दिली. छाप्याची कारवाई पूर्ण झाल्यानंतर ईडीने अरमान जैनला राजीव कपूर यांच्या अंत्यसंस्कारात सामिल होण्याची परवानगी दिली होती.
175 कोटी रुपयांचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा
गेल्यावर्षी, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेतर्फे टॉम्प ग्रुपच्या माजी कर्मचाऱ्यांच्या तक्रारीवर कंपनीचे प्रमोटर राहुल नंदा आणि दूसऱ्या लोकांविरोधात FIR दाखल केला आहे. याच FIR च्या आधारावर ED ने इंफोर्समेंट केस इंफर्मेशन रिपोर्ट (ECIR) दाखल केला. 28 ऑक्टोबर 2020 ला दाखल केलेल्या FIR नुसार टॉप्स ग्रुपने मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन डेव्हलपमेंट अथॉरिटी (MMRDA) ला 175 कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.
टॉप्स ग्रुपला MMRDA च्या ठिकाणांवर सुरक्षा रक्षकांना नियुक्त करण्याचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला होता. असा आरोप केला जातो की नंदांचे जुने मित्र सरनाईक यांनी त्यांना हा करार करण्यास मदत केली. टॉप्स ग्रुपच्या माध्यमातून सरनाईक यांच्या कंपन्यांनी परदेशात पैसे पाठवल्याचा संशयही आहे. युकेमध्ये केलेली गुंतवणूक आणि मॉरिशसमधील ट्रस्ट यांच्यामुळे नंदा हे देखील संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत, परंतु त्यांनी कोणत्याही चुकीच्या गोष्टीस नकार दिला आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.