आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
2021 या नवीन वर्षाचा पहिला दिवस अभिनेता रणबीर कपूरसाठी अतिशय खास ठरला आहे. शाहिद कपूर स्टारर 'कबीर सिंह' या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी रणबीरसोबतच्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. 1 जानेवारी रोजी त्यांनी सोशल मीडियावर या चित्रपटाचा एक टीजर रिलीज करुन चित्रपटाचे शीर्षक सांगितले आहे. या चित्रपटाचे नाव 'अॅनिमल' असे आहे.
Experience the emotion.... :-)https://t.co/Qqu3d9308Z#RanbirKapoor @AnilKapoor @ParineetiChopra @thedeol @imvangasandeep @VangaPranay #BhushanKumar #KrishanKumar @MuradKhetani #TSeriesFilms @Cine1Studios @VangaPictures @TSeries @rameemusic@KuttiKalam
— Sandeep Reddy Vanga (@imvangasandeep) December 31, 2020
या चित्रपटात रणबीर कपूरसह अभिनेते अनिल कपूर यांची महत्त्वाची भूमिका आहे. अनिल यांनीही या चित्रपटाची घोषणा करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये चित्रपटाशी संबंधित माहिती दिली जात आहे. याशिवाय या व्हिडिओमध्ये रणबीरचा आवाज येतो आहे आणि तो म्हणत आहे की, 'पापा पुढच्या आयुष्यात तुम्हाला माझा मुलगा व्हायचं आहे, मग मी तुमच्यावर प्रेम कसे करतो हे पाहा. मग तुम्ही हे शिका कारण त्याच्या पुढच्या आयुष्यात मीच तुमचा मुलगा आणि तुम्हीच माझे वडील असाल.' या संवादावरुन चित्रपटात वडील-मुलाची इमोशनल बाँडिंग बघायला मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.
Oh boy! The new year just gets better with this whistle!😉
— Anil Kapoor (@AnilKapoor) December 31, 2020
Presenting, #Animal, can't wait for our journey to begin.#RanbirKapoor @ParineetiChopra @thedeol @imvangasandeep @VangaPranay #BhushanKumar #KrishanKumar @MuradKhetani #TSeriesFilms pic.twitter.com/AHPoGFVGSn
अनिल आणि रणबीरसह बॉबी आणि परिणीती महत्त्वाच्या भूमिकेत
भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सीरिज, प्रणय रेड्डी वांगाच्या भद्रकाली पिक्चर्स आणि मुराद खेतानींच्या सिने 1 स्टुडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि अनिल कपूरशिवाय बॉबी देओल आणि परिणीती चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा टीजर व्हिडिओ शेअर करुन अनिल कपूर म्हणाले - ‘ओह बॉय! नवीन वर्ष या शिट्ट्यासारखा (व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये जो आवाज ऐकू येतोय) अधिक चांगले जावे. हा प्रवास सुरु करण्यासाठी मी अजून प्रतीक्षा करु शकत नाही.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.