आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टिझर रिलीज:रणबीर कपूर-संजय दत्तच्या 'शमशेरा'चा टिझर लाँच, 24 जूनला ट्रेलर तर 22 जुलैला येणार चित्रपट

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओ पहा...

रणबीर कपूरचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'शमशेरा'चा टिझर लाँच झाला आहे. टिझरमध्ये रणबीर आणि संजय दत्तचा लूक लक्ष वेधून घेतोय. यासोबतच निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजची तारीखही जाहीर केली आहे. शमशेराचा ट्रेलर 24 जूनला रिलीज होणार आहे. टिझरची सुरुवात रणबीरच्या ‘सांसों में तूफानों का डेरा, निगाहें जैसे चील का पहरा। कोई रोक ना पाएगा इसे, जब उठे ये बनके सवेरा।’ या धमाकेदार संवादाने होते. या चित्रपटात रणबीर कपूर दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या एका व्यक्तीरेखेचे नाव शमशेरा तर दुसऱ्या व्यक्तीरेखेचे नाव बल्ली असे आहे.

या चित्रपटात रणबीर व्यतिरिक्त, वाणी कपूर, संजय दत्त, आशुतोष राणा, रोनित रॉय आणि सौरभ शुक्ला यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तब्बल 150 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा करण मल्होत्रा यांनी सांभाळली असून हा चित्रपट 22 जुलै रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. 'शमशेरा'च्या ट्रेलर लाँचसाठी संजय दत्त, रणबीर कपूर आणि वाणी कपूर तीन वेगवेगळ्या शहरात जाणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती आदित्य चोप्रा यांनी केली आहे.