आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवा वाद:रणबीरचा 3 वर्षांपूर्वीचा व्हिडिओ होतोय व्हायरल, म्हणाला होता - 'करण जबरदस्ती शोमध्ये बोलवून आमच्या नावावर पैसे कमावतो' 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रणबीरचा जुना व्हिडिओ व्हायरल होतोय.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये घराणेशाहीवरुन वाद पेटला आहे. यात बॉलिवूडमध्ये स्टार किड्सना लाँच करणा-या करण जोहरचे नाव अग्रस्थानी आहे. त्यावरुन करणवर जोरदार टीका सुरु आहे. आता त्याचा गाजलेला कॉफी विथ करण हा शो वादाच्या भोव-यात सापडला आहे. अभिनेता रणबीर कपूरचा तीन वर्षांपूर्वीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात त्याने करणच्या या शोबद्दल नाराजी व्यक्त केली होती. 

  • आम्ही करणला उत्तरं देऊन अडचणीत सापडतो - रणबीर 

AIB सोबत झालेल्या एका मुलाखतीमध्ये रणबीरला ‘कॉफी विथ करण’ या शो विषयी प्रश्न विचारण्यात येतो. त्यावर रणबीरने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. करणच्या प्रश्नांची उत्तरं देएऊन आम्ही अडचणीत सापडतो असे तो रणबीर म्हणाला होता. 

‘मला आता कंटाळा आला आहे. मी या सीझनमध्ये सहभागी होऊ शकत नाही असे पण सांगितले होते. मला जबदस्ती बोलवण्यात आले होते. मी आणि अनुष्का या विरोधात बोलणार होतो आणि संपूर्ण इंडस्ट्रीला सोबत घेणार होतो. हे चुकीचे आहे. करण जोहर या शोमधून पैसे कमावतो.’ असे रणबीरने म्हटले. शिवाय भेटवस्तू म्हणून तो आयफोनशिवाय दुसरे काहीही देत नसल्याचेही रणबीरने सांगितले होते. 

  • आलिया म्हणाली- मी सुशांतला मारणार 

सुशांतच्या मृत्यूसाठी स्टार किड्सला दोषी मानणा-या नेटक-यांनी एक व्हिडिओ व्हायरल केला होता. ज्यात आलिया करणच्या या शोमध्ये सुशांतला मारणार असल्याचे म्हणतेय. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या फॉलोअर्सची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती.  आलिया नंतर सोनम कपूर आणि रणबीर कपूरच्या विधानांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

  • सोनमचा व्हिडिओही व्हायरल झाला होता

सुशांत सिंहच्या निधनानंतर सोनम कपूरने रिया चक्रवर्तीचे समर्थन करणारे ट्विट केले होते. त्यानंतर तिलादेखील ट्रोलही केले गेले. करणच्या शोमध्येच सुशांतशी संबंधित प्रश्नावर सोनमने त्याला ओळखत नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली होती. सोनमच्या त्याच प्रतिक्रियेचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...