आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अपकमिंग प्रोजेक्ट:'अ‍ॅनिमल'मध्ये पती-पत्नीची भूमिका साकारणार रणबीर-परिणीती, रणबीरच्या वडिलांच्या भूमिकेत अनिल कपूर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अद्याप चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख निश्चित झालेली नाही.

अभिनेता रणबीर कपूरने या वर्षाच्या सुरूवातीला म्हणजे 1 जानेवारी रोजी आपल्या आगामी ‘अ‍ॅनिमल’ या नव्या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात रणबीरसह परिणीती चोप्रा, अनिल कपूर आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आता या चित्रपटासंदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात परिणीती रणबीर कपूरच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. तर अनिल कपूर रणबीरच्या वडिलांची भूमिका साकारणार आहे. चित्रपटात वडील-मुलाची इमोशनल बाँडिंग बघायला मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

'कबीर सिंह'चे दिग्दर्शक करणार दिग्दर्शन
‘कबीर सिंह’ या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप वंगा यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट बनणार आहे. या चित्रपटाद्वारे रणबीर पहिल्यांदाच संदीपसोबत काम करणार आहे. तर या चित्रपटातून परिणीती आणि रणबीर देखील पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

रणबीरने 1 जानेवारीला शेअर केले होते मोशन पोस्टर
1 जानेवारी रोजी आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा करताना रणबीरने चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले होते. अनिल कपूर यांनीही या चित्रपटाची घोषणा करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यामध्ये चित्रपटाशी संबंधित माहिती दिली गेली होती. या व्हिडिओमध्ये रणबीरचा आवाज ऐकू येतोय आणि तो म्हणतोय, 'पापा पुढच्या आयुष्यात तुम्हाला माझा मुलगा व्हायचं आहे, मग मी तुमच्यावर प्रेम कसे करतो हे पाहा. मग तुम्ही हे शिका कारण त्याच्या पुढच्या आयुष्यात मीच तुमचा मुलगा आणि तुम्हीच माझे वडील असाल.'

तर चित्रपटाचा टीजर व्हिडिओ शेअर करुन अनिल कपूर म्हणाले होते - ‘ओह बॉय! नवीन वर्ष या शिट्ट्यासारखा (व्हिडिओच्या बॅकग्राऊंडमध्ये जो आवाज ऐकू येतोय) अधिक चांगले जावे. हा प्रवास सुरु करण्यासाठी मी अजून प्रतीक्षा करु शकत नाही.'

भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांच्या टी-सीरिज, प्रणय रेड्डी वांगाच्या भद्रकाली पिक्चर्स आणि मुराद खेतानींच्या सिने 1 स्टुडिओज अंतर्गत या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. अद्याप चित्रपटाची प्रदर्शनाची तारीख निश्चित झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...