आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Entertainment
  • Bollywood
  • Ranbir Singh's Double Role In The Remake Of The 1982 Blockbuster Film Angoor, Will Romance With Jacqueline Fernandes And Pooja Hegde In Rohit Shetty's Directorial

रोहित शेट्टीचा नवीन प्रोजेक्ट:1982 च्या ब्लॉकबस्टर 'अंगुर' चित्रपटाच्या रिमेकमध्ये रणवीर सिंगची दुहेरी भूमिका, जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडेसोबत करणार रोमान्स

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्यांदाच इंडस्ट्रीतला सर्वात दमदार अभिनेता रणवीर एकाचवेळी दोन पात्रे साकारताना दिसणार आहे.

सिंबा आणि सूर्यवंशीनंतर रोहित शेट्टी आणि रणवीर सिंग आता लवकरच एका नव्या प्रोजेक्टसाठी एकत्र येणार आहेत. रोहित 1982 चा ब्लॉकबस्टर ठरलेल्या अंगुर या चित्रपटाचा रिमेक बनवणार असून यासाठी त्याने मुळ चित्रपटात संजीव कुमार यांनी साकारलेल्या भूमिकेसाठी रणवीर सिंगला फायनल केले आहे. रणवीर नंतर आता जॅकलिन फर्नांडिस आणि पूजा हेगडे यांच्याही नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

रोहितला रणवीरऐवजी शाहरुखला घ्यायचे होते

नुकत्याच आलेल्या फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार दिग्दर्शक रोहित शेट्टी चित्रपटाच्या पटकथेवर काम करत असून कथेला मॉर्डन टच देतोय. 1982 मध्ये गुलजार यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता, ज्यात संजीव कुमार यांनी दुहेरी भूमिका केल्या. रोहित बर्‍याच वर्षांपासून या चित्रपटाचा रिमेकची तयारी करत आहे. 2015 च्या सुरुवातीला रोहितला शाहरुखबरोबर हा चित्रपट बनवायचा होता, परंतु त्यावेळ गोष्टी फायनल होऊ शकल्या नाहीत. अंगुरचे काम पुढे ढकलल्यानंतर शाहरुख आणि रोहित दिलवाले चित्रपटात एकत्र आले होते.

एकापाठोपाठ हिट चित्रपट देणारा रोहित गोलमालनंतर आता सिम्बा आणि सूर्यवंशीमध्ये व्यस्त होता. लॉकडाऊन दरम्यान, दिग्दर्शकाला स्क्रिप्टवर काम करण्यास बराच काळ मिळाला, त्यानंतर त्याने अंगुर चित्रपटाचे पात्रही अंतिम केले आहे. पहिल्यांदाच इंडस्ट्रीतला सर्वात दमदार अभिनेता रणवीर एकाचवेळी दोन पात्रे साकारताना दिसणार आहे.

यापूर्वी रोहित शेट्टीने गोलमाल चित्रपटावर आधारित बोल बच्चन या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांना हसवण्यात बरेच यश मिळवले होते. या चित्रपटात अभिषेक बच्चन, अजय देवगण यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या.

बातम्या आणखी आहेत...