आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभिनेता रणबीर कपूर स्टारर शमशेरा हा चित्रपट गेल्या आठवड्यात रिलीज झाला. 150 कोटींहून अधिकच्या बजेटमध्ये बनलेला 'शमशेरा' भारतात 4 दिवसांत केवळ 34 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन करू शकला आहे. व्यापार विश्लेषकांचे मते, हा चित्रपट डिजास्टर ठरला आहे. चित्रपटाचे लाइफ टाईम कलेक्शन अंदाजे 50 कोटी इतकेचे होऊ शकेल. चित्रपटातील रणबीरच्या अभिनयाचे कौतुक केले जात आहे पण चित्रपटाच्या पटकथेत दम नाही आणि दिग्दर्शन प्रेक्षकांना खिळवून ठेऊ शकलेले ॉ नाही.
यासोबतच रणबीर त्याच्या आगामी 'ब्रह्मास्त्र' चित्रपटामुळेही चर्चेत आहे, या चित्रपटाचे बजेटे सुमारे 500 कोटींच्या घरात आहे. ब्रह्मास्त्र 9 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, आलिया भट्ट आणि नागार्जुन यांच्याही भूमिका आहेत. आता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काय कमाल करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
चला तर मग एक नजर टाकूया रणबीरच्या चित्रपटांवर जे बॉक्स ऑफिसवर फ्लॉपच्या यादीत जमा झाले होते -
सावरियां - 2007
रणबीर कपूरचे नाव बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट आहे, परंतु त्याचा पहिला चित्रपट सावरियां बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. 40 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 39.02 कोटींचे कलेक्शन केले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले होते.
बेशरम - 2013
रणबीर कपूर, नीतू कपूर आणि ऋषी कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगले प्रदर्शन करु शकला नाही. 83 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर केवळ 77 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट अभिनव कश्यप यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात रणबीर कपूर पहिल्यांदाच आई-वडिलांसोबत दिसला होता.
तमाशा- 2015
इम्तियाज अली दिग्दर्शित तमाशा या चित्रपटाबाबत प्रचंड ट्रेंड होता, पण चित्रपट चालला नाही. 87 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने भारतात जवळपास 70 कोटींचा व्यवसाय केला होता.
रॉय- 2105
या चित्रपटात रणबीर कपूरने एक्सटेंडेट कॅमिओ भूमिका केली होती. हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करण्यात अयशस्वी ठरला. 50 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाचे एकूण कलेक्शन सुमारे 47 कोटी होते. या चित्रपटात अर्जुन रामपाल आणि जॅकलिन फर्नांडिस मुख्य भूमिकेत दिसले होते.
बॉम्बे वेल्वेट - 2015
अनुराग कश्यप दिग्दर्शित रणबीर कपूरचा हा चित्रपट देखील फ्लॉप चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात या अभिनेत्याने बलराजची व्यक्तिरेखा चांगली साकारली होती, पण तरीही तो फारशी छाप उमटवू शकला नाही. 120 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने केवळ 32 कोटींचा गल्ला जमवला होता.
जग्गा जासूस - 2017
या यादीत रणबीर कपूरच्या जग्गा जासूस या चित्रपटाच्या नावाचाही समावेश आहे. या चित्रपटाचे बजेट 131 कोटी होते आणि बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने केवळ 54 कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटात रणबीरसोबत कतरिना कैफ दिसली होती. हा चित्रपट अनुराग बासू आणि रणबीर यांनी संयुक्तपणे दिग्दर्शित केला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.