आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्याची कबुली:रणदीप हुड्डाने 'एक्सट्रॅक्शन' या हॉलिवूड चित्रपटासाठी केस कापण्याआधी सुवर्ण मंदिरात मागितली होती माफी

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डब्बाबंद झाला 'बॅटल ऑफ सारागढी'

अभिनेता रणदीप हुड्डाने गेल्यावर्षी एक्सट्रॅक्शन या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला होता. ज्यावेळी त्याला हॉलिवूडपटाची ऑफर आली तेव्हा तो बॅटल ऑफ सारागढी या चित्रपटासाठी तयारी करत होता. रणदीपने या चित्रपटासाठी केस आणि दाढी वाढवली होती. जोपर्यंत बॅटल ऑफ सारागढी हा एतिहासिक चित्रपट पूर्ण करत नाही तोपर्यंत केस कापणार नाही अशी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात मी शपथ घेतली होती, असे रणदीपने सांगितले.

डब्बाबंद झाला 'बॅटल ऑफ सारागढी'
रणदीपने एका मुलाखतीत सांगितले की, दाढी आणि केस वाढवण्यासाठी त्याने तीन वर्षे इतर कोणतेही नवीन काम हाती घेतले नव्हते. त्यासाठी त्याने सुवर्ण मंदिरात जाऊन शपथ घेतली होती की, जोपर्यंत चित्रपट पूर्ण होणार नाही, तोपर्यंत दाढी आणि केस कापणार नाही. मात्र यातच रणदीपला हॉलिवूडच्या चित्रपटाची ऑफर आली. ज्यात त्याला भूमिकेसाठी केस कापणे गरजेचे होते. पण सारागढीच्या लढाईवर आधारित चित्रपटाचे काम पुढे सरकत नव्हते. त्यामुळे रणदीपने अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात जाऊन आधी माफी मागितली आणि मगच हॉलिवूड चित्रपटासाठी केस कापले.

याविषयी तो म्हणाला, 'मी आधी हॉलिवूड चित्रपटाची ऑफर नाकारणार होतो. मात्र नंतर मी शांतपणे विचार केला. लक्षात आले हा चित्रपट कुठेही चालला नाही. मग मी गुरुद्वारात गेलो. माफी मागितली आणि केस कापले. त्यानंतर एक्सट्रॅक्शन चित्रपटाचे काम सुरू केले,' असे रणदीप म्हणाला. रिपोर्टनुसार, 'बॅटल ऑफ सारागढी' हा चित्रपट आता डब्बाबंद झाला आहे.

'एक्सट्रॅक्शन'ला एक वर्ष पूर्ण
ज्या चित्रपटासाठी रणदीपने शपथ मोडली त्या चित्रपटाच्या रिलीजला 24 एप्रिल रोजी एक वर्ष पूर्ण झाले आहे. रणदीप अलीकडेच सलमान खान स्टारर 'राधे' या चित्रपटात खलनायक राणाच्या भूमिकेत झळकला. 'अनफेअर अँड लवली' हा त्याचा आगामी चित्रपट असून यात तो इलियाना डिक्रूजसोबत काम करतोय.

बातम्या आणखी आहेत...