आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडमध्ये कोरोना:74 वर्षीय रणधीर कपूर रुग्णालयात दाखल, भाऊ राजीवच्या मालमत्तेच्या वादातून चर्चेत आहे कपूर कुटुंब

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 74 वर्षीय रणधीर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, 74 वर्षीय रणधीर यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीविषयीची फारशी माहिती समोर आलेली नाही.

राजीव कपूर यांच्या संपत्तीच्या वादामुळे चर्चेत आहेत रणधीर कपूर

दिवंगत राजीव कपूर (रणधीर यांचे धाकटे बंधू) यांच्या मालमत्तेच्या वादावरून कपूर कुटुंब सध्या चर्चेत आहे. राजीव कपूर घटस्फोटित होते आणि त्यांना मुलबाळही नाही. याचवर्षी फेब्रुवारी महिन्यात राजीव यांचे निधन झाले होते. त्यामुळे राजीव यांच्या संपत्तीसाठी रणधीर आणि त्यांची बहीण रिमा जैन कोर्टात पोहोचले आहेत. रणधीर कपूर आणि रिमा जैन यांच्या वकिलांनी म्हटले की, राजीव यांच्या संपत्तीवर या दोघांचा हक्क आहे. त्यावर सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने दोघांना राजीव कपूर यांच्या घटस्फोटाची कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे. घटस्फोटाचे पेपर्स मिळत नसल्याने ही कागदपत्र सादर न करण्याची सूट देण्यात यावी असा अर्ज रिमा आणि रणधीर यांनी कोर्टात केला. न्यायालयाने रणधीर आणि रिमा यांचा हा अर्ज स्वीकारला आहे. पण न्यायाधीश गौतम यांनी रणधीर आणि रिमा यांना स्वीकृती पत्र देण्यास सांगितले आहे.

करीना आणि करिश्माचे वडील आहेत रणधीर
रणधीर कपूर बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आणि करीना कपूर यांचे वडील आहेत. रणधीर यांनी 1971 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री बबिताशी लग्न केले होते. लग्नाच्या काही वर्षात दोघे वेगळे राहू लागले. परंतु त्यांचा घटस्फोट झालेला नाही. रणधीर यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर बबिता यांनी एकटीने दोन्ही मुलींचे संगोपन केले.

अनेक चित्रपटांत केलंय रणधीर यांनी काम
15 फेब्रुवारी 1947 रोजी जन्मलेल्या रणधीर कपूर यांनी 'श्री 420' (1955) या चित्रपटात बाल कलाकार म्हणून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर त्यांनी बर्‍याच चित्रपटांत काम केले आणि चित्रपट निर्माता म्हणूनही ओळख मिळवली. रणधीर कपूर यांच्या महत्त्वपूर्ण चित्रपटांमध्ये 'कल आज और कल', 'जवानी दीवानी', 'रामपूर का लक्ष्मण' आणि 'चाचा भतिजा' यांचा समावेश आहे.

16 महिन्यांत तीन बहीणभावंडांना गमावले
शोमॅन म्हणून ओळखल्या जाणार्‍या राज कपूर यांच्या पाच मुलांपैकी तीन मुलांचे गेल्या 16 महिन्यांत निधन झाले आहे. राज कपूर यांना रणधीर, ऋषी आणि राजीव ही तीन मुले आणि रितू आणि रिमा या दोन मुली होत्या. आता तीन भावांपैकी रणधीर कपूर आणि बहिणींमध्ये रिमा जैन हयात आहेत. ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल 2020 रोजी कॅन्सरमुळे निधन झाले. ऋषी कपूर दोन वर्षे कर्करोगाशी लढा देत होते. मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली होती. तर सर्वात धाकटे भाऊ राजीव यांचे यावर्षी 9 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बहीण रितू नंदा यांचे 14 जानेवारी 2020 रोजी दिल्लीत निधन झाले होते. त्यांना कॅन्सर झाला होता.

बातम्या आणखी आहेत...