आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेल्थ अपडेट:ICU मध्ये स्थिर आहे रणधीर कपूर यांची प्रकृती, धाकटी बहीण रीमा जैन म्हणाल्या - दोन भावांना गमावले, एक रुग्णालयात दाखल आहे

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • माझी मनःस्थिती ठीक नाहीः रीमा जैन

कोविड -19 ची लागण झाल्यानंतर अभिनेते रणधीर कपूर मुंबईस्थित कोकिलाबेन अंबानी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे. “रणधीर यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. ते काही दिवस रुग्णालयातच राहतील.” असे रुग्णालयाच्या सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, 74 वर्षीय रणधीर यांची धाकटी बहीण रीमा जैन यांनी आपले दुःख व्यक्त करताना म्हटले की, गेल्या दोन वर्षांत मी माझ्या दोन भावांना गमावले आहे, आणि आता एक भाऊ रुग्णालयात आहे.

माझी मनःस्थिती ठीक नाहीः रीमा जैन 30 एप्रिल रोजी रणधीर यांचे धाकटे भाऊ ऋषी कपूर यांची पहिली पुण्यतिथी होती. यानिमित्ताने एका संभाषणात आपल्या भावाचे स्मरण करताना रीमा जैन म्हणाल्या, "मी माझे दोन भाऊ (ऋषी कपूर आणि राजीव कपूर) गमावले आहेत आणि एक रुग्णालयात आहे. त्यामुळे माझी मनःस्थिती चांगली नाही. प्रार्थना करते की, त्यांच्या (ऋषी) आत्म्याला शांती मिळेल. मला त्यांची खूप आठवण येते," अशा शब्दांत रीमा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही रणधीर यांना झाला संसर्ग

ई-टाईम्सशी बोलताना रणधीर यांनी सांगितले होते की, त्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. मात्र तरीदेखील कोविडचा संसर्ग कसा झाला, हे समजले नाही. ते म्हणाले, "कोविडचा संसर्ग कसा झाला, याची मला कल्पना नाही. मला धक्का बसला आहे. माझा पाच सदस्यांचा स्टाफदेखील पॉझिटिव्ह आला आहे. मी त्यांनादेखील माझ्यासह कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल केले आहे," असे रणधीर यांनी सांगितले.

16 महिन्यांत तीन बहीणभावंडांना गमावले
शोमॅन म्हणून ओळखल्या जाणार्‍या राज कपूर यांच्या पाच मुलांपैकी तीन मुलांचे गेल्या 16 महिन्यांत निधन झाले आहे. राज कपूर यांना रणधीर, ऋषी आणि राजीव ही तीन मुले आणि रितू आणि रीमा या दोन मुली होत्या. आता तीन भावांपैकी रणधीर कपूर आणि बहिणींमध्ये रीमा जैन हयात आहेत. ऋषी कपूर यांचे 30 एप्रिल 2020 रोजी कॅन्सरमुळे निधन झाले. ऋषी कपूर दोन वर्षे कर्करोगाशी लढा देत होते. मुंबईतील एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली होती. तर सर्वात धाकटे भाऊ राजीव यांचे यावर्षी 9 फेब्रुवारी रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. बहीण रितू नंदा यांचे 14 जानेवारी 2020 रोजी दिल्लीत निधन झाले होते. त्यांना कॅन्सर झाला होता.

बातम्या आणखी आहेत...