आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैफ-करीनाचा दुसरा मुलगा:आजोबा रणधीर कपूर यांनी सांगितले- बेबोचा दुसरा मुलगा त्याचा मोठा भाऊ तैमूरसारखा दिसतो

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धाकट्या भावाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेला होता तैमूर

सैफ अली खान आणि करीना कपूर पुन्हा एकदा एका गोंडस बाळाचे पालक झाले आहेत. करीनाने रविवारी (21 फेब्रुवारी) मुंबईच्या ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आपल्या दुसर्‍या मुलाला जन्म दिला. मात्र, अद्याप करीनाच्या धाकट्या मुलाचे छायाचित्र समोर आलेले नाही. चाहते बेबी बॉयच्या पहिली झलक बघण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत. दरम्यान, करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी एका न्यूज वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, बेबोचा धाकटा मुलगा त्याचा मोठा भाऊ तैमूरसारखा दिसतो.

सैप आणि करीना यांचा धाकटा मुलगा आईसारखा दिसतो की वडिलांसारखा? असा प्रश्न रणधीर कपूर यांना विचारला असता ते म्हणाले, "मला सर्व मुले सारखीच वाटतात. मात्र आमच्या घरी सर्वजण करीनाचा छोटा मुलगा त्याचा मोठा भाऊ तैमूरसारखा दिसत असल्याचे म्हणत आहेत," असे ते म्हणाले.

तैमूर आणि सैफ खूप उत्साही आहेत

रणधीर कपूर यांनी रविवारी ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन मुलगी करीना आणि नातवाची भेट घेतली. या भेटीपूर्वी त्यांनी एका न्यूज वेबसाईटला सांगितले की, "करीना आणि बाळ दोघेही ठीक आहेत. मी अद्याप माझ्या नातवाला पाहिलेले नाही. पण मी करीनाशी बोललो आहे आणि तिने तिची आणि बाळाची तब्येत उत्तम असल्याचे सांगितले. पुन्हा एकदा आजोबा झाल्याने मी आनंदी आहे आणि बाळाला बघण्यास उत्सुक आहे. तैमूरदेखील मोठा भाऊ झाल्याने खूप खूप आहे आणि सैफही खूप उत्साही आहे."

धाकट्या भावाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेला होता तैमूर
रणधीर कपूर यांच्याव्यतिरिक्त सैफ आणि करीनाचा मोठा मुलगा तैमूरसुद्धा आपल्या धाकट्या भावाला भेटण्यासाठी रुग्णालयात गेला होता. करीनाची आई बबिता, बहीण करिश्मा आणि पती सैफ यांनाही रुग्णालयाच्या बाहेर स्पॉट केले होते. त्यांचे काही व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल झाले होते.

बातम्या आणखी आहेत...