आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणबीर-आलिया वेडिंग:आलिया भट्ट आणि रणबीर कपूरच्या लग्नावर रणधीर कपूर म्हणाले – मला लग्नाबद्दल काहीच माहिती नाही

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रणधीर यांना लग्नाबद्दल काहीही माहिती नाही

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट सध्या त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहेत. हे दोघे एप्रिलच्या दुस-या आठवड्यात लग्न करणार असल्याचे वृत्त आहे. इतकेच नाही तर दोघे डेस्टिनेशन वेडिंग करणार नसून कपूर कुटुंबाचे वडिलोपार्जित घर मुंबईतील चेंबूर येथील आरके हाऊसमध्ये हा लग्नसोहळा पार पडणार आहे. तर काही रिपोर्टनुसार, रणबीर आणि आलिया एप्रिलमध्ये साखरपुडा उरकून डिसेंबरमध्ये लग्न करणार असल्याचीही चर्चा आहे. अद्याप या लग्नाबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. दुसरीकडे रणबीरचे काका रणधीर कपूर यांनीही लग्नाचे वृत्त फेटाळून लावले आहे.

रणधीर यांना लग्नाबद्दल काहीही माहिती नाही
रिपोर्ट्सनुसार, रणबीरचे काका रणधीर कपूर यांनी लग्नाच्या सर्व बातम्या फेटाळून लावल्या आहेत. ते म्हणाले, "सध्या मी मुंबईत नाही आणि मला लग्नाची कोणतीही बातमी मिळालेली नाही. आमच्या येथे एवढे मोठे लग्न होत असेल तर कुणीतरी फोन करून मला नक्कीच सांगितले असते."

आलियाने अद्याप सेलिब्रिटी मेहंदी आर्टिस्टशी संपर्क साधलेला नाही
सेलिब्रिटी मेहंदी आर्टिस्ट वीणा नागदा यांनी आलियाच्या अनेक चित्रपटांमध्ये तिच्या हातावर मेहंदी काढली आहे. लग्नाबाबत त्या म्हणाल्या, “माझ्याशी अद्याप कोणीही संपर्क साधलेला नाही. काही दिवसांपूर्वी मी आलियाला भेटले होते, पण तिनेही लग्नाबद्दल काहीही सांगितले नाही. लग्न खरंच या महिन्यात होत असेल तर?, ही माझ्यासाठी शॉर्ट नोटिसची गोष्ट असेल."

सोनम कपूरच्या लग्नात रणबीर आणि आलिया
सोनम कपूरच्या लग्नात रणबीर आणि आलिया

2018 मध्ये चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले
आलिया आणि रणबीर फेब्रुवारी 2018 मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले. मे 2018 मध्ये बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात दोघांनीही कपल म्हणून एकत्र हजेरी लावली होती.

'ब्रह्मास्त्र'मध्ये एकत्र दिसणार आहेत आलिया-रणबीर
आलिया आणि रणबीर पहिल्यांदाच अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ब्रह्मास्त्र' या चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट दोन भागात प्रदर्शित होणार असून त्याचा पहिला भाग यावर्षी 9 सप्टेंबरला सिनेमागृहात दाखल होणार आहे. या चित्रपटात रणबीर आणि आलिया यांच्यासह अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया, नागार्जुन अक्किनेनी आणि मौनी रॉय यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

बातम्या आणखी आहेत...