आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणधीर कपूर यांचा वाढदिवस:बबितासोबत टाइमपास करत असल्याने राज कपूर यांनी मुलगा रणधीर फटकारले होते, लग्नाच्या काही वर्षांतच दोघेही वेगळे झाले मात्र घटस्फोट घेतला नाही

6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रणधीर कपूर यांचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरले नाही.

बॉलिवूड अभिनेते रणधीर कपूर यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. 15 फेब्रुवारी 1947 रोजी जन्मलेल्या रणधीर कपूर यांनी 'श्री 420' (1955) या चित्रपटातून बालकलाकार म्हणून फिल्मी दुनियेत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. रणधीर कपूर यांच्या महत्त्वाच्या चित्रपटांमध्ये 'कल आज और कल', 'जवानी दीवानी', 'रामपूर का लक्ष्मण' आणि 'चाचा भतीजा' यांचा समावेश आहे.

रणधीर कपूर यांचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरले नाही.
रणधीर कपूर यांचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरले नाही.

बबितासोबत टाईमपास करत होते रणधीर
काही महिन्यांपूर्वी रणधीर कपूर कपिल शर्माच्या शोमध्ये आले होते, जिथे कपिलने त्यांना 'कल आज और कल' मधील बबिता आणि त्यांच्यावर चित्रीत झालेल्या 'आप यहाँ आए किस लिए' या गाण्याबद्दल विचारले. या गाण्यात लग्न करण्याबाबत काही ओळी आहेत. यात जी मागणी होती ती कथेची मागणी होती की तुमच्या मनातून आलेली होती, असा प्रश्न कपिलने रणधीर यांना विचारला होता. त्यावर रणधीर यांनी उत्तर दिले की, 'माझी मागणी आधीच होती. त्यामुळेच मी केली.' थोडक्यात रणधीर यांना सांगायचे होती की, बबिता यांच्याशी त्यांना लग्न करायचे होते आणि ही मागणी त्या गाण्यातून करण्यात आली.

बबितासोबतच्या नात्याबद्दल राज कपूर आणि कपूर कुटुंबाला माहिती होती का?, असे विचारले असता रणधीर यांनी हो असे उत्तर दिले. "माझा टाईमपास सुरु होता. तेव्हा वडिलांनी विचारले, 'मला लग्न करायचे आहे की नाही?'.

रणधीर यांनी सांगितल्यानुसार, बबिताशी लग्न करण्याचा त्यांचा विचार नव्हता, पण तेव्हा वडिलांनी विचारले, "ती म्हातारी झाल्यावर तिच्याशी लग्न करशील का?" रणधीर गंमतीने म्हणाले होते की, त्यांनी बबिताला प्रपोज केले नाही, त्यांच्या आई-वडिलांनी त्यांच्या वतीने तिला लग्नाची मागणी घातली होती.

रणधीर-बबिताच्या लग्नाला मन्सूर अली खान आणि शर्मिला टागोरही पोहोचले होते.
रणधीर-बबिताच्या लग्नाला मन्सूर अली खान आणि शर्मिला टागोरही पोहोचले होते.

रणधीर यांनी बबिताशी 1971 मध्ये लग्न केले. लग्नानंतर दोघांचे फारसे पटले नाही आणि ते वेगळे राहू लागले. मात्र, त्यांनी कधीही घटस्फोट घेतला नाही आणि मुलांच्या संगोपनापासून प्रत्येक जबाबदारी सांभाळत एकमेकांना साथ दिली. जुन्या मुलाखतीत रणधीर यांनी बबितासोबतच्या त्यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने सांगितले होते.

लग्नानंतर नात्यात आला दुरावा
'कल आज और कल' या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बबिता आणि रणधीर कपूर यांच्या प्रेमाला सुरुवात झाली. रणबीरसोबत लग्न करण्यासाठी बबिता आपले करिअर पणाला लावायला तयार झाल्या होत्या. 6 नोव्हेंबर 1971 रोजी बबिता आणि रणधीर कपूर यांचे लग्न झाले. त्याचवेळी बबिता यापुढे चित्रपटांमध्ये काम करणार नाहीत असा निर्णय घेण्यात आला होता.

याचे कारण असे की, कपूर घराण्यातील सून आणि मुलीला त्याकाळी चित्रपटांमध्ये काम करण्याची परवानगी नव्हती. बबिता यांनी चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. लग्नानंतर बबिता यांनी 25 जून 1974 रोजी करिश्मा आणि 21 सप्टेंबर 1980 रोजी करीना कपूरला जन्म दिला. यानंतर बबीता आणि रणधीर यांच्यात तणाव निर्माण झाला होता. याचा परिणाम म्हणजे बबिता आपल्या दोन मुलींसह स्वतंत्रपणे राहू लागल्या. दोघांमध्ये दुरावा निर्माण झाल्यानंतर त्यांनी घटस्फोट घेतला नाही आणि दुसरे लग्नही केले नाही.

बबीता यांना रणधीर यांच्या सवयी आवडत नव्हत्या
काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत रणधीर कपूर व्यक्त झाले होते. त्यांनी सांगितले होते, 'मी एक वाईट माणूस आहे, जो दारु पिऊन उशीरा घरी येतो, हे त्यांना (बबिता) कळले होते. या सर्व अशा गोष्टी होत्या, ज्या त्यांना आवडत नव्हत्या. मला त्यांच्या मनासारखं आणि त्यांना माझ्या मनासारखं राहणं जमत नव्हतं. आम्ही लव्ह मॅरेज केलं होते. आम्ही दोन मुलींचे आईवडील झालो होतो, तरी आमच्यात काही जमेनासं होतं. बबिता यांनी मुलींना चांगले संस्कार दिले. मुली मोठ्या होऊन आपल्या करिअरमध्ये यशस्वी झाल्या. एक वडील म्हणून मला आणखी काय हवं आहे?,' असे रणधीर कपूर म्हणाले होते.

घटस्फोट का घेतला नाही?
जेव्हा मुलाखतील रणधीर कपूर यांना त्यांनी बबितापासून घटस्फोट का घेतला नाही, असे विचारले असता, ते म्हणाले होते, घटस्फोट कशासाठी?... आम्ही घटस्फोट का घ्यावा? मला किंवा बबिताला पुन्हा लग्न करायचे नव्हते, असे रणधीर यांनी सांगितले. रणधीर आणि बबिता यांनी 1971 मध्ये आलेल्या 'कल आज कल' या चित्रपटात एकत्र काम केले होते. यानंतर दोघे 1972 मध्ये आलेल्या 'जीत' या चित्रपटात एकत्र दिसले होते. लग्नानंतर बबिता यांनी आपल्या अभिनय करिअरला कायमचा रामराम ठोकला.

बातम्या आणखी आहेत...