आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हेल्थ अपडेट:कोरोनाची लागण झाल्यानंतर रणधीर कपूर यांच्यावर ICU मध्ये उपचार सुरु,  लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही झाला संसर्ग

8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रणधीर कपूर म्हणाले - संसर्ग कसा झाला माहित नाही?

अभिनेता रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मुंबईतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल केल्याची बातमी गुरुवारी आली होती. आता ताज्या वृत्तानुसार, त्यांना आयसीयूमध्ये हलविण्यात आले आहे. स्वतः 74 वर्षीय रणधीर कपूर यांनी एका इंग्रजी न्यूज वेबसाइटशी बोलताना ही माहिती दिली आहे. ते म्हणाले, “पुढील काही चाचण्यांसाठी मला इंटेन्सिव्ह केअर युनिट (आयसीयू) मध्ये हलविण्यात आले आहे.'

संसर्ग कसा झाला माहित नाही?
ई-टाईम्सशी बोलताना रणधीर पुढे म्हणाले, "हॉस्पिटलमध्ये माझी खूप चांगली काळजी घेतली जात आहे. सर्व काही नियंत्रणात आहे. ते माझ्यासाठी सर्व काही करत आहेत. संपूर्ण वेळ डॉक्टर माझ्या आजूबाजूला असतात." इतकेच नाही आपण कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले असून संसर्ग कसा झाला, हे माहित नसल्याचे रणधीर यांनी सांगितले आहे.

ते म्हणाले, "कोविडचा संसर्ग कसा झाला, याची मला कल्पना नाही. मला धक्का बसला आहे. माझा पाच सदस्यांचा स्टाफदेखील पॉझिटिव्ह आला आहे. मी त्यांनादेखील माझ्यासह कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल केले आहे," असे रणधीर यांनी सांगितले.

कोरोनाचा संसर्ग झाल्याचे असे कळले
रिपोर्ट्सनुसार, आयसीयूमध्ये जाण्यापूर्वी रणधीर यांनी सांगितले होते की, त्यांचे हातपाय थरथर कापू लागले होते. सौम्य तापदेखील होता. त्यामुळे त्यांनी कोविडची चाचणी करण्याचे ठरवले. त्यातच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.

रणधीर यांनी सांगितल्यानुसार, त्यांना कोणताही त्रास होत नाहीये. त्यांना श्वसनाचा त्रास होत नाहीये, सोबतच आयसीयूत ऑक्सिजन सपोर्टचीही गरज भासली नाही. दोन्ही मुली करिश्मा - करीना आणि पत्नी बबिता यांचीही कोविडची चाचणी झाली असून तिघींचाही रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.

अनेक चित्रपटांत केलंय रणधीर यांनी काम
15 फेब्रुवारी 1947 रोजी जन्मलेल्या रणधीर कपूर यांनी 'श्री 420' (1955) या चित्रपटात बाल कलाकार म्हणून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. त्यानंतर त्यांनी बर्‍याच चित्रपटांत काम केले आणि चित्रपट निर्माता म्हणूनही ओळख मिळवली. रणधीर कपूर यांच्या महत्त्वपूर्ण चित्रपटांमध्ये 'कल आज और कल', 'जवानी दीवानी', 'रामपूर का लक्ष्मण' आणि 'चाचा भतिजा' यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...