आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गृहप्रवेश:नवीन घरात शिफ्ट झाले रणधीर कपूर, म्हणाले - चेंबूरच्या घरात मला एकटेपणा जाणवत होता

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रणधीर यांना पत्नी आणि मुलींच्या घराजवळ राहायचे होते

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर नवीन घरात शिफ्ट झाले आहे. वांद्रे येथे त्यांचे हे नवीन घर आहे. चेंबुरच्या घरात एकटेपणा जाणवत होता म्हणून नवीन घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतल्याचे रणधीर कपूर यांनी सांगितले आहे. एका मुलाखतीत ते म्हणाले की, '3000 चौरस फूटात पसरलेल्या या नवीन घरात मला पुर्वीपेक्षा अधिक आरामदायक वाटत आहे.' शुक्रवारी (3 जुलै) रणधीर यांनी आपल्या नवीन घरात गृह प्रवेशाची पूजा ठेवली होती. या पूजेत करीना कपूर, करिश्मा कपूर, वहिनी नीतू कपूर, भाची रिद्धिमा कपूर साहनी आणि भाचा आधार जैन उपस्थित होते.

चेंबूरच्या घरात रणधीर यांना एकटेपणा जाणवू लागला होता

मुलाखतीत रणधीर म्हणाले, "मला येथे (नवीन घरात) बरे वाटत आहे. मला पूर्वीपेक्षा जास्त एकटेपणा जाणवू लागला होता. या घरात माझे कुटुंबीय लगेच येऊ शकतात. नुकतीच नवीन घरी एक पूजादेखील झाली. माझे मित्रदेखील खार आणि वांद्रा परिसरातच राहतात," असे ते म्हणाले.

रणधीर चेंबूरमध्ये आपले घर विकणार नाहीत
चेंबूर येथील घर विकायचे ठरवले आहे का? असा प्रश्न रणधीर यांना विचारला असता ते हसले आणि आपली आर्थिक परिस्थिती तितकी वाईट नसल्याचे ते सांगतात. रणधीर म्हणाले, "नाही, आमची आर्थिक परिस्थिती तितकीशी वाईट नाही. ते घर तसेच राहील. ते खूप मोठे घर आहे आणि मी तिथे एकटा राहायचो," असे त्यांनी सांगितले. रणधीर कपूर यांनी अलीकडेच आपले दोन भाऊ ऋषी कपूर आणि राजीव कपूर यांना गमावले आहे.

रणधीर यांना पत्नी आणि मुलींच्या घराजवळ राहायचे होते
रणधीर यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, त्यांना त्यांची पत्नी बबिता कपूर, मुलगी करीना आणि करिश्मा यांच्या घराजवळ राहायचे आहे. रणधीर म्हणाले होते, "माझ्या आई-वडिलांनी सांगितले होते की मी हवं तेवढे दिवस चेंबूर या घरात राहू शकतो. परंतू जेव्हा मी ते घर विकण्याचा निर्णय घेईन तेव्हा मला घराच्या विक्रीतून आलेले पैसे माझ्या सर्व भावंडाना म्हणजे ऋषी, राजीव, रीतू आणि रीमा यांना समान द्यावे लागतील. मला यात काहीच अडचण नाही. कारण मी माझ्या कारकीर्दीत खूप चांगले काम केले आहे आणि माझ्याकडे चांगली गुंतवणूक आहे. राजीव बहुतेक माझ्याबरोबर राहत होता. पुण्यात त्याचे स्वतःचे घर होते पण तो बहुतेक मुंबईत राहायचा. आता मी बबिता, बेबो (करीना) आणि लोलो (करिश्मा) यांच्या घराजवळ शिफ्ट होतोय," असे त्यांनी सांगितले होते.

बातम्या आणखी आहेत...