आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कपूर कुटुंब झाले ट्रोल:धाकटा भाऊ राजीवच्या निधनाच्या 5 दिवसानंतर रेस्तराँमध्ये झाली रणधीर कपूरची बर्थडे पार्टी, सोशल मीडिया यूजर म्हणाले- किती निर्लज्ज लोक आहेत

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • रणधीर कपूर यांच्या बर्थडे पार्टीत करीना कपूरसह आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी हजेरी लावली.

ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर 74 वर्षांचे झाले आहेत. 15 फेब्रुवारी 1947 रोजी कपूर घराण्यात त्यांचा जन्म झाला. रणधीर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला मुंबईतील एका रेस्तराँमध्ये पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत त्यांच्या दोन्ही मुली करिश्मा-करीनासह, जावई सैफ अली खान, भाचा आदर जैन, धाकटे भाऊ ऋषी कपूर यांची पत्नी नीतू कपूर, पुतण्या रणबीर कपूर, पुतणी रिद्धिमा कपूर साहनी, अभिनेत्री आलिया भट्ट, तारा सुतारिया आणि अभिनेता संजय कपूरसह अनेक सेलेब्स दिसले. ही पार्टी रात्री एक वाजेपर्यंत चालली.

मात्र, रणधीर यांचे धाकटा भाऊ राजीव यांच्या निधनाच्या अवघ्या पाच दिवसांत झालेल्या या पार्टीमुळे सोशल मीडिया युजर्स कपूर कुटुंबाला ट्रोल करत आहेत.

सोशल मीडिया यूजर्सनी दिल्या अशा प्रतिक्रिया
पार्टीनंतरचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशाच एका व्हिडिओवर कमेंट करताना एका नेटक-याने लिहिले, "हे किती निर्लज्ज लोक आहेत.. काही दिवस तर थांबायला हवे होते." आणखी एका नेटक-याने लिहिले, "मला आश्चर्य वाटतंय. अजून एक आठवडादेखील झाला नाही आणि हे लोक पार्टीचा आनंद लुटत आहेत. शो मस्ट गो ऑन प्रकारातील हे लोक आहेत. आलिया मला आवडायची पण आता नाही," अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

आणखी एका नेटक-याने म्हटले, "वाढदिवसाचा उत्साह... कसा? त्यांना भावना नाहीत. त्यांचा (रणधीर) भाऊ दोन-तीन दिवसांपूर्वीच मरण पावला आहे. डिस्गस्टिंग." एका नेटक-याने म्हटले, "ऋषीजी गेल्यानंतर कपूर कुटुंबियांकडून अजून काय अपेक्षा केली जाऊ शकते. ऋषीजी जिवंत असते तर असे दृश्य दिसले नसते. हे ढोंगी लोक आहेत. धक्का बसला आहे."

9 फेब्रुवारी रोजी राजीव कपूर यांचे निधन झाले

9 फेब्रुवारी रोजी राजीव कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. गेल्या 7 महिन्यांत त्यांच्या कुटुंबातील हा दुसरा मृत्यू आहे. तर दोन वर्षातच रणधीर यांनी आपल्या कुटुंबातील चार सदस्य गमावले आहेत. एका मुलाखतीत रणधीर म्हणाले होते की, राजीवच्या मृत्यूनंतर ते घरात एकटे राहिले आहेत.

रणधीर म्हणाले होते, "काय चालले आहे ते मला माहित नाही? मी ऋषी आणि राजीव यांच्या जवळ होतो. मी माझ्या कुटुंबातील चार सदस्य गमावले आहेत. माझी आई कृष्णा राज कपूर, मोठी बहीण रितू नंदा, ऋषी आणि आता राजीव." 1 ऑक्टोबर 2018 रोजी कृष्णा राज कपूर, 14 जानेवारी 2020 रोजी रितू नंदा, 30 एप्रिल 2020 रोजी ऋषी कपूर यांचे निधन झाले होते. रणधीर यांच्या म्हणण्यानुसार, या चौघांसोबत घरात त्यांचे सर्वाधिक बोलणे व्हायचे.