आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनावर यशस्वी मात:रणधीर कपूर यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, म्हणाले -  मी घर परतलोय आणि अगदी बरा आहे

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही दिवस पत्नी आणि मुलींना भेटणार नाहीत रणधीर कपूर

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना कोविड 19 ची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता एका मुलाखतीत त्यांनी सांगितले की, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ते रुग्णालयातून घरी परतले आहेत.

काही दिवस पत्नी आणि मुलींना भेटणार नाही
रणधीर म्हणाले, "मी घरी आलो आहे. आणि माझी तब्येत अगदी बरी आहे." कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी पुढील काही दिवस पत्नी बबिता आणि मुली करीना कपूर आणि करिश्मा कपूर यांना भेटणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

रणधीर यांनी रुग्णालयातील स्टाफचे आभार मानले

रणधीर म्हणाले, "डॉक्टरांनी मला काही दिवस सगळ्यांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. काही काळानंतर मी सर्वांना भेटू शकेल." ते पुढे म्हणाले, "मी रुग्णालयातील सर्व कर्मचार्‍यांचे आभार मानतो. त्यांनी तिथे माझी चांगली काळजी घेतली."

मला श्वास घ्यायला त्रास झाला नाही: रणधीर
रणधीर जेव्हा पॉझिटिव्ह आले होते, तेव्हा ते म्हणाले होते, "मला कोरोनाची लागण कशी झाली, याची मला कल्पना नाही. मला धक्का बसला आहे. माझ्या घरातील पाच कर्मचारीदेखील पॉझिटिव्ह आले आहेत. मी त्यांना माझ्यासोबत कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल केले आहे." ते पुढे म्हणाला होते, "मला ऑक्सिजन सपोर्टची गरज भासली नाही. मला श्वासोच्छवासाला त्रास झाला नाही, देवाची माझ्यावर कृपा आहे," असे ते म्हणाले होते.

बातम्या आणखी आहेत...