आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'रंगबाज 3'च्या स्टारसोबत खास बातचीत:अभिनेता म्हणून स्वत:ला कोणत्याही भूमिकेत झोकून देता येणे ही मला मिळालेली दैवी देणगी : विनीत

इंद्रेश गुप्ता6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विनीत कुमार सिंह लवकरच ‘रंगबाज 3’ वेब सिरिजमध्ये दिसणार आहे. त्यात तो एक बाहुबली बनला आहे. या पात्राबाबत त्याने केलेल्या तयारीबाबत त्याच्याशी मारलेल्या दिलखुलास गप्पा...

  • ‘रंगबाज’मधून तू पुन्हा एकदा गुन्हेगारी भूमिकेत दिसणार आहेस. अशी पात्रे किती उत्साहित करतात?

माझ्याबाबत असेच घडते. चांगली भूमिका असेल आणि ती बहुरंगी तसेच आव्हानात्मक असेल तर ती करण्यात मजा येते. गँगस्टर टाइपचे पात्र मी ‘गँग्ज ऑफ वासेपूर’मध्येही केले होते. त्यानंतर लोकांनी मला ‘मुक्काबाज’मध्ये एका आव्हानात्मक भूमिकेत पाहिले. मी करत असलेल्या भूमिकेची पूर्ण तयारी करतो. आधीपेक्षा काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न करतो. या सिरीजमध्ये हारुन शाह बेगचे पात्र माझ्यासाठी नवे होते. कारण ते गँगस्टरसोबतच राजकारणीही आहे.

  • या सिरिजसाठी तुला कसे निवडण्यात आले?

अजय राय तिचे निर्माते आहेत. लेखक सिद्धार्थ मिश्रा आणि दिग्दर्शक सचिन पाठक यांनी मला निवडले तेव्हा तिची कथा लिहिली जात होती. चित्रीकरण सुरू होण्याआधी 6-7 महिन्यांपूर्वीच मी होकार दिला. कथा ऐकली तेव्हा या सिरीजमधून खूप शक्यता आणि अपेक्षा वाटल्या. त्यात माझा ऑनस्क्रीन प्रवास 18-40 वर्षादरम्यान आहे. लेखन सुरू झाले तसे मी अजय आणि नवदीप सतत एकमेकांच्या संपर्कात होतो.

  • या फ्रेंचायजीचे दोन्ही भाग लोकप्रिय आहेत. यावेळी चेहरा तुझा आहे. काही दबाव जाणवतोय काय?

ट्रेलरला चांगला प्रतिसाद मिळाला. मालिकेचे दोन्ही हंगाम लोकप्रिय राहिले. त्यामुळे दबाव नसला तरी जबाबदारी मात्र नक्कीच आहे. या पात्राच्या तयारीसाठी 3 महिन्यांपूर्वी दुसरे कोणतेही काम करणे बंद केले. त्यातील 30 ते 40 वयाच्या पात्रासाठी मला 10 किलो वजन वाढवावे लागले. मुलाखत

  • ‘आधार’ आणि ‘मुक्काबाज’नंतर दुसऱ्या कोणत्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार?

आगामी तीनही चित्रपटात माझ्या प्रमुख भूमिका आहेत. त्यात ‘आधार’, ‘सिया’, ‘दिल है ग्रे’ आहे.

  • फुल शेड निगेटिव्ह भूमिकेबाबत काय विचार आहे?

मी अभिनयात प्रयोग करत राहीन. माझी हारूनची भूमिका नकारात्मक आहे. मात्र कथा त्याच्यावरच आधारित आहे. त्यामुळे तो नायकही आहे, असे म्हणावे लागेल. त्यात माझी वेगळीच अदाकारी दिसणार आहे. मी कोणत्याही भूमिकेची औपचारिकता करत नाही. प्रेक्षकांना चकित करण्याचा प्रयत्न करतो.

  • ही तुझी तिसरी वेब सिरिज आहे. कोणत्या साच्यात तुला अनुरुप आणि सुरक्षित वाटते?

खरे सांगायचे झाल्यास चित्रीकरणादरम्यान काही फरक वाटत नाही. वेब सिरीज असो वा चित्रपट दोन्ही एकाच पद्धतीने बनतात. स्क्रिप्टमध्ये असेल त्या पद्धतीनेच आम्हाला काम करावे लागते. सिनेमाची एक वेगळीच मजा असते. लोक थिएटरमध्ये एकत्र बसून तो पाहतील आणि प्रतिक्रिया देतील. तुमच्या भूमिकेतील भावना 400-500 लोक एकत्रितपणे अनुभवतील. बाकी मला सर्वच ठिकाणी भूमिका करताना कम्फर्टेबल वाटते.

  • स्वत:च्या कामाकडे, भूमिकेकडे एक टीकाकार म्हणून कसे पाहशील?

मी दोन पद्धतीने यावर प्रतिक्रिया देईन. पहिली म्हणजे कोणत्याही भूमिकेत स्वत:ला समरस करून घेणे हा गुण माझ्यात आहे. ही देणगी मला देवानेच दिली आहे. दुसरे म्हणजे ‘मुक्काबाज’नंतर मला तेथे पोहोचायचे होते.मात्र मी पोहोचू शकलो नाही. माझा एखादा थिएट्रिकल रिलिज होऊ शकला नाही. आगामी काळात ती उणीव पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन.

  • स्वत:ला कोणत्या महान व्यक्तीच्या चरित्रपटात स्वत:ला परिपूर्ण मानतो?

मी बिरसा मुंडा यांच्या जीवनाबद्दल प्रचंड प्रेरित आहे. हे पात्र मी उत्तमप्रकारे करू शकेन असे वाटते. त्यांच्या आयुष्याबद्दल खूप काही सांगण्यासारखे आहे.त्यांच्यावर दिग्दर्शक पा रंजित एक चित्रपट बनवत आहेत. मात्र त्यावर दुसरे दिग्दर्शकही चित्रपट बनवत असतील तरी मला त्यात काम करायला आवडेल. या चित्रपटात आपल्या देशाची रचना आणि स्वातंत्र्याच्या लढाईपर्यंत सर्वकाही समाविष्ट आहे. त्यात अ‍ॅक्शन आहे आणि नाट्यही. इतिहासातील ही भूमिका मला अतिशय आवडते.

बातम्या आणखी आहेत...