आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणी मुखर्जीच्या मुलीच्या बर्थडेला सेलेब्सची मांदियाळी:यशराज स्टुडिओमध्ये जंगी सेलिब्रेशन, रेखा, सोनमसह हे सेलिब्रिटी झाले स्पॉट

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री राणी मुखर्जी आणि आदित्य चोप्रा यांनी शुक्रवारी रात्री त्यांची लेक आदिरा चोप्राचा सातवा वाढदिवस साजरा केला. यशराज स्टुडिओमध्ये जंगी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रेखा, करण जोहर, सोनम कपूर, शिल्पा शेट्टी आणि तुषार कपूर यांच्यासह अनेक बीटाउन सेलिब्रिटींनी या बर्थडे पार्टीला हजेरी लावली. करण जोहर आपल्या मुलांशिवाय पार्टीत पोहोचला, तर शिल्पा मुलगी शमिशा आणि मुलगा विआन राजसोबत येथे पोहोचली. बर्‍याच दिवसांनंतर रेखा या देखील एका बर्थडे पार्टीत दिसल्या. काल रात्रीचे फोटो सोशल मीडियावर चर्चेत आहेत.

2014 मध्ये झाले होते राणी आणि आदित्य चोप्रा यांचे लग्न
राणी मुखर्जीने 2014 मध्ये निर्माता-दिग्दर्शक आदित्य चोप्रासोबत लग्न केले होते. 2015 मध्ये आदिराचा जन्म झाला. आदिरा शुक्रवारी 7 वर्षांची झाली आहे.

राणीचे आगामी प्रोजेक्ट्स
राणी लवकरच आशिमा छिब्बरच्या 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' या चित्रपटात दिसणार आहे. ती अखेरची सैफ अली खानसोबत 'बंटी और बबली 2' मध्ये दिसली होती. आपल्या करिअरमध्ये राणीने 'गुलाम', 'कुछ कुछ होता है', 'ब्लॅक', 'नो वन किल्ड जेसिका', 'हम तुम', 'मर्दानी', 'वीर-जारा', 'बंटी और बबली' यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...