आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराणी मुखर्जी, अनिर्बन भट्टाचार्य, नीना गुप्ता स्टारर 'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे' हा चित्रपट 17 मार्च रोजी मोठ्या पडद्यावर दाखल झाला आहे. आशिमा छिब्बर या चित्रपटाच्या दिग्दर्शिका आहेत. या चित्रपटाच्या कथेवर नॉर्वेच्या राजदूतांनी नाराजी व्यक्त केली आहे. ही केवळ काल्पनिक कथा असल्याचे नॉर्वेचे राजदूत हंस जेकब फ्रेडनलिंड यांनी म्हटले आहे. या चित्रपटात खरे प्रकरण पण नॉर्वेच्या प्रशासनाशी संबंधित गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
एका सत्य घटनेवर आधारित आहे हा चित्रपट
'मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे'ची कथा एका सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटात एक भारतीय आई आपल्या मुलांना कायदेशीर पेचातून बाहेर काढण्यासाठी देशाच्या कायदेशीर व्यवस्थेवर आणि प्रशासनावर कशी मात करते, हा चित्रपटाचा क्लायमॅक्स आहे.
चित्रपटात दाखवलेले तथ्य चुकीचे : भारतातील नॉर्वेचे राजदूत
चित्रपटाच्या कथेवर नाराजी व्यक्त करताना भारतातील नॉर्वेचे राजदूत हंस जेकोब फ्रेडनलिंड म्हणाले - चित्रपटात नॉर्वेचे चुकीच्या पद्धतीने चित्रण करण्यात आले आहे. या कथेत नॉर्वेबद्दलची तथ्ये पुर्णपणे चुकीची आहेत. चित्रपटात अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत.
प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत राजदूत हंस जेकब फ्रेडनलिंड म्हणाले - 'अधिकृतपणे नॉर्वेची बाजू घेणे आणि तथ्ये दुरुस्त करणे मला आवश्यक वाटते. चित्रपटाला रंजक बनवण्यासाठी 'आवश्यकतेपेक्षा जास्त' क्रिएटिव्ह लिबर्टी घेण्यात आली आहे. चित्रपट पाहिल्यावर असे दिसते की, या प्रकरणात दोन्ही देशांमधील सांस्कृतिक फरक ही सर्वात मोठी समस्या होती. पण ते तसे नाही,' असे ते म्हणाले.
सांस्कृतिक फरकामुळे मुले आईपासून विभक्त झाली नाहीत
राजदूत जेकोब फ्रेडनलिंड म्हणाले, 'प्रकरणाचा तपशील न सांगता मी असे म्हणू शकतो की, या मुलांना एकाच बेडवर झोपवल्यामुळे किंवा त्यांना हाताने खाऊ घातल्याने त्यांना पर्यायी काळजीसाठी पाठवण्यात आले नाही. या प्रकरणात किंवा इतर कोणत्याही प्रकरणात तसे झाले नाही. नॉर्वेची संस्कृती चित्रपटात दाखवल्याप्रमाणे नाही. आम्ही आमच्या मुलांनाही आमच्या हाताने खाऊ घालतो.'
आपल्या मुलीबद्दल बोलताना राजदूत जेकोब फ्रेडनलिंड म्हणाले की, ते स्वतः आपल्या मुलांना झोपताना गोष्टी सांगतात. फ्रेडनलिंड म्हणाले - जेव्हा आमचे भारतीय मित्र हा चित्रपट पाहतील तेव्हा ते आमच्या संस्कृतीबद्दल आणि आमच्याबद्दल काय विचार करतील?, असा प्रश्न त्यांनी विचारला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.