आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राणी मुखर्जीला चित्रपटसृष्टीत 25 वर्षे पूर्ण:राणी म्हणते - 'आयुष्यभर गांभीर्य आणि प्रामाणिकपणे काम करत राहील'

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राणीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1996 मध्ये आलेल्या 'राजा की आएगी बारात' या चित्रपटाद्वारे केली होती.

अभिनेत्री राणी मुखर्जीला बॉलिवूडमध्ये येऊन आता 25 वर्षे झाली आहेत. यानिमित्ताने ती म्हणाली, “मी शिकलेला सर्वात मोठा धडा म्हणजे सतत शिकत राहणे. एखाद्या कलाकारासाठी शिकणे कधीही थांबत नाही, असे मला वाटते. म्हणून माझे सर्वात मोठे शिक्षण म्हणजे कामांवर लक्ष केंद्रित करणे आणि आपले काम प्रामाणिकपणाने पूर्ण करणेच आहे आणि मी ते सुरू ठेवीन.'

राणी पुढे म्हणते, 'मी माझ्या चाहत्यांशिवाय जगू शकत नाही. विशेषत: विवाहित अभिनेत्रीला ज्या प्रकारच्या आव्हानांना सामोरे जावे लागते त्या प्रवासात चाहत्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. त्यांच्यामुळेच मी अजूनही काम करत आहे. मी माझा प्रवास कधीच थांबवणार नाही. 25 वर्षे लोटल्यानंतरही मला अजूनही बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत,' असे राणी म्हणाली.

राणीने आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1996 मध्ये आलेल्या 'राजा की आएगी बारात' या चित्रपटाद्वारे केली होती. मात्र तिला खरी ओळख 'मेहंदी' आणि 'कुछ कुछ होता है' या चित्रपटांमधून मिळाली. राणीने 'ब्लॅक' या चित्रपटाद्वारे आपल्या सशक्त अभिनयाचे दर्शन घडवले.

राणी बॉलिवूडमधील एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिने एकाच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि क्रिटिक्स अवॉर्ड आपल्या नावी केले. हे पुरस्कार तिला 'ब्लॅक' या चित्रपटातील अभिनयासाठी मिळाले होते.

राणीला आतापर्यंत 17 वेळा फिल्मफेअर अवॉर्डसाठी नॉमिनेशन मिळाले, तर सात वेळा तिने आपला पुरस्कार आपल्या नावी केला. याशिवाय तिने झी सिने, स्टार गिल्ड, आयफासह अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटवली आहे.

राणीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे म्हणजे ती लवकरच 'बंटी और बबली 2' या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट 2005 मध्ये आलेल्या 'बंटी और बबली' या चित्रपटाचा सिक्वेल आहे. याशिवाय 'मर्दानी'च्या पुढच्या भागातही ती झळकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...